मागील काही महिन्यांपासून इराण आणि अमेरिकेत युद्ध सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणची लष्करी शक्ती नष्ट झाल्याचा दावा केला होता. पण आता अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालामुळे ट्रम्प यांच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इराणला अजूनही अनेक क्षेपणास्त्र तळांवर आणि लष्करी पायाभूत सुविधांवर प्रवेश आहे.
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणच्या ३३ पैकी ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही सक्रिय आहेत. हा तोच प्रदेश आहे, जिथून जगातील सुमारे २०% तेलपुरवठा होतो. जर तणाव पुन्हा वाढला, तर अमेरिकेची युद्धनौका आणि तेलवाहू जहाजे धोक्यात राहू शकतात.
गुप्तचर अहवालानुसार, इराणकडे अजूनही त्याचे सुमारे ७० टक्के मोबाईल क्षेपणास्त्र प्रक्षेपक आणि युद्धापूर्वीच्या क्षेपणास्त्र साठ्यापैकी जवळपास ७० टक्के साठा आहे, यामध्ये मध्य पूर्वेतील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. इतकेच नव्हे, तर इराणच्या सुमारे ९० टक्के भूमिगत क्षेपणास्त्र साठवणूक आणि प्रक्षेपण सुविधा किंवा पूर्णपणे पुन्हा कार्यान्वित झाल्या असल्याचे मानले जाते.
इराणची क्षेपणास्त्रे नष्ट झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांचे मंत्री सातत्याने इराणचे सैन्य मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले असल्याचा दावा करत आहेत. दरम्यान, आता गुप्तचर विभागाचा अहवाल समोर आला आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या मते, अमेरिकेकडे बंकर-बस्टर शस्त्रांचा मर्यादित साठा असल्यामुळे, अनेक ठिकाणी संपूर्ण भूमिगत प्रणाली नष्ट करण्याऐवजी फक्त प्रवेशद्वार बंद करण्याची रणनीती वापरण्यात आली.
Web Summary : US intelligence contradicts Trump's claims, revealing Iran's missile capabilities remain largely intact. Despite purported destruction, Iran retains access to missile sites, mobile launchers, and underground facilities. 30 of 33 missile sites near the Strait of Hormuz are active, posing a threat to US warships and oil tankers if tensions escalate.
Web Summary : अमेरिकी खुफिया विभाग ने ट्रंप के दावों का खंडन किया, जिससे पता चलता है कि ईरान की मिसाइल क्षमता काफी हद तक बरकरार है। कथित विनाश के बावजूद, ईरान के पास मिसाइल स्थलों, मोबाइल लांचर और भूमिगत सुविधाओं तक पहुंच है। होर्मुज जलडमरूमध्य के पास 33 में से 30 मिसाइल स्थल सक्रिय हैं, जो तनाव बढ़ने पर अमेरिकी युद्धपोतों और तेल टैंकरों के लिए खतरा पैदा कर सकते हैं।