पुणे : नसरापूर येथे लैंगिक अत्याचारात जीव गमावलेल्या चिमुरडीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या असून, त्या जखमा टणक वस्तूने केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. त्या वस्तूबाबत चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देत नाही. तसेच सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपीच्या हातामध्ये शेवेचा पुडा दिसत आहे. ती शेव त्याने कोठून खरेदी केली याबाबत प्रश्न विचारला असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असून, तपासात सहकार्य करत नाही, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
दरम्यान, विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीत १४ मेपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला आहे. नसरापूर येथे तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी भीमराव कांबळे (६५) याला अटक करण्यात आली होती. ही घटना १ मे रोजी घडली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला मंगळवारी पुन्हा ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.
या प्रकरणी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये पीडितेच्या शरीरावर जखमा आढळून आल्या असून, त्या टणक वस्तूने केल्याचे निदर्शनास आले होते. त्या वस्तूबाबत आरोपीकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देत नाही. तसेच, पीडितेला गोठ्यात घेऊन जात असताना आरोपीच्या हातामध्ये शेव पुडा दिसत आहे. ती शेव त्याने कोठून खरेदी केली याबाबत त्याला प्रश्न विचारला असता तो उत्तर देण्यास टाळाटाळ करत असून, तपासात सहकार्य करत नाही.
घटना स्थळाच्या आसपासच्या परिसरातून आणखी काही सीसीटीव्ही चित्रीकरण प्राप्त झाले असून, त्यात नवीन काही माहिती मिळते का? त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याचे काम सुरू आहे. त्याला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली आहे का? याचा तपास करायचा आहे. त्यासाठी त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी युक्तिवादादरम्यान विशेष सरकारी वकील ॲड. अरुंधती ब्रह्मे यांनी केली. सरकार व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्याचा आदेश दिला.
Web Summary : Nasrapur murder: Postmortem reveals victim's injuries from hard object. Accused evades 'shev' purchase questions, hindering investigation. Police seek extended custody to investigate accomplices and analyze CCTV footage.
Web Summary : नसरापुर हत्या: पोस्टमार्टम से पता चला कि पीड़िता की चोटें कठोर वस्तु से लगीं। आरोपी 'शेव' खरीद के सवालों से बच रहा है, जिससे जांच में बाधा आ रही है। पुलिस साथियों की जांच और सीसीटीवी फुटेज का विश्लेषण करने के लिए हिरासत बढ़ाने की मांग कर रही है।