Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 11:43 IST

महिलेचा लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने टॅक्सीचालकाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

मुंबई : मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेचा लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने टॅक्सीचालकाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ‘हातावर चुंबन घेणे ही हॉटेल उद्योगातील सामान्य प्रथा आहे’ हा आरोपीचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला.

एस्प्लनेड न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी प्रशांत एस. घोडके यांनी २८ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात म्हटले की, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट प्रशिक्षणात एखाद्याच्या हातावर चुंबन घेऊन अभिवादन करण्याची पद्धत शिकवली जाते, असे पुरावे नोंदीवर नाहीत. त्यामुळे अशा कृतीला ‘सामान्य अभिवादन’ मानता येणार नाही.

रॉकी फर्नांडिस या आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (लैंगिक छळ) आणि ३५४(डी) (पाठलाग करणे) अंतर्गत दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सीसीटीव्ही पुरावे नसल्याचा बचाव पक्षाचा दावा न्यायालयाने फेटाळला. 

पीडितेची साक्ष विश्वासार्ह असल्याचे नमूद करत न्यायालयाने आरोपीचे वर्तन हे पाठलाग आणि लैंगिक छळाच्या श्रेणीत येत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, अपील दाखल करण्यासाठी शिक्षेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Taxi driver jailed for sexual harassment; kissing hand not normal.

Web Summary : Mumbai taxi driver sentenced to two years for sexually harassing a hotel worker. Court rejected his claim that kissing a hand is a normal greeting in the hospitality industry. The court cited credible testimony and lack of evidence supporting the accused's claim.
टॅग्स :लैंगिक छळगुन्हेगारीन्यायालय