शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:19 IST

नितीन नबीन सध्या बिहार सरकारमध्ये मंत्री आहेत.

BJP: भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती 14 डिसेंबर 2025 पासून तात्काळ लागू झाली असून, बिहारसह राष्ट्रीय राजकारणात भाजपची रणनीती अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

संसदीय बोर्डाचा निर्णय, औपचारिक आदेश जारी

या नियुक्तीबाबत भाजपकडून अधिकृत संघटनात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव व मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ही नियुक्ती भाजपच्या संसदीय बोर्डाने केली आहे. आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, सध्या बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले नितीन नबीन आता राष्ट्रीय स्तरावर संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सांभाळतील.

सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल

पक्ष नेतृत्वाने नितीन नबीन यांचा संघटनात्मक अनुभव, स्थानिक पकड आणि प्रशासकीय क्षमता लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे, याआधी जेपी नड्डा यांनाही राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यापूर्वी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, त्यामुळे नबीन यांच्या नियुक्तीकडे भविष्यातील मोठ्या भूमिकेचा संकेत म्हणून पाहिले जात आहे.

सध्याची जबाबदारी आणि राजकीय प्रवास

नितीन नबीन सध्या बिहारमधील नितीश कुमार सरकारमध्ये रस्ते बांधकाम मंत्री आहेत. ते पाटणा येथील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. कायस्थ समाजातून येणारे नबीन हे भाजपचे ज्येष्ठ नेते नवीन किशोर सिन्हा यांचे पुत्र असून, विद्यार्थी राजकारणापासून संघटनेतील विविध पदांपर्यंत त्यांनी प्रदीर्घ प्रवास केला आहे.

शिस्तबद्ध संघटक अशी ओळख

भाजपमध्ये नितीन नबीन यांची ओळख शिस्तप्रिय संघटक आणि जलद निर्णय घेणारे नेता अशी आहे. बिहार भाजपमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, राज्यातील संघटना मजबूत करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Appoints Nitin Nabin as National Working President

Web Summary : BJP appointed Bihar minister Nitin Nabin as National Working President, effective December 14, 2025. This aims to strengthen BJP's national strategy, recognizing Nabin's organizational experience and administrative skills. The decision, made by the parliamentary board, signals a potentially larger future role.
टॅग्स :BJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह