शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आपण यांना पाहिलंत का? भाजपा खासदार सनी देओल यांच्याबाबत मतदारसंघात लागले पोस्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 10:20 IST

निवडून आल्यानंतर मतदारसंघात न फिरकल्याने सनी देओल हरवल्याचे पोस्टर मतदारसंघात लागले आहेत

पठाणकोट - सिनेजगतातील अनेक अभिनेते, अभिनेत्री लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण करत असतात. त्यापैकी काही निवडणुका लढवून लोकप्रियतेच्या जोरावर निवडूनही येतात. मात्र निवडणूक जिंकल्यानंतर ही मंडळी आपल्या दैनंदिन व्यापात गुंतून जातात. मग त्यांचे आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होते. असाच काहीसा प्रकार भाजपाच्या तिकीटावर खासदार झालेल्या सनी देओल यांच्याबाबत घडला असून, निवडून आल्यानंतर मतदारसंघात न फिरकल्याने सनी देओल हरवल्याचे पोस्टर मतदारसंघात लागले आहेत. 

बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेले सनी देओल हे पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील जाखड यांना 80 हजारांहून अधिकच्या मताधिक्याने पराभूत केले होते.  मात्र निवडून आल्यानंतर मतदारसंघाकडे फारसे न फिरकल्याने त्यांच्याविरोधात स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातूनच मतदारसंघातील प्रमुख शहर असलेल्या पठाणकोट येथे सनी देओल हे हरवल्याचे पोस्टर्स लागले आहेत. मात्र हे पोस्टर्स कुणी लावले हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. 

दरम्यान, सनी देओल यांच्या एका निर्णयावरून याआधीही वाद झाला होता. सनी देओल यांनी आपल्याकडून सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून गुरप्रीत सिंह पलहेरी यांची नियुक्ती केली होती. त्यावरून मोठा वाद झाला होता. आपले प्रतिनिधी म्हणून पलहेरी हे मतदारसंघातील सर्व प्रकरणांवर लक्ष घालतील, अशी घोषणा सनी देओल यांनी केली होती. मात्र त्याला भाजपाच्याच नेत्यांनी विरोध करत या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  

बॉलिवूडच्या या सेलिब्रेटींनी लढवली आहे निवडणूक, कुणाचा झाला विजय तर कुणाचा पराजय

या व्यक्तिमुळे सनी पहिल्यांदा बोलला होता हेमा मालिनीसोबत, कारण वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

सनी देओलला डिम्पल कपाडियाच्या मुली मारतात या नावाने हाक, जाणून घ्या त्यांच्या प्रेमकथेविषयी

टॅग्स :Sunny Deolसनी देओलBJPभाजपाgurdaspur-pcगुरदासपूरPunjabपंजाबPoliticsराजकारण