ठळक मुद्देदिल आशना है या चित्रपटात डिम्पलवर एक पॅराग्लायडिंगचे दृश्य चित्रीत करायचे होते. पण चित्रीकरणाच्या काही दिवस आधी पायलटला अपघात झाला असल्याने हा सीन करताना डिम्पल प्रचंड घाबरली होती. त्यामुळे सनी चित्रपटाच्या सेटवर येऊन हेमा यांना भेटला होता.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्न केले त्याआधी धर्मेंद्र हे विवाहित होते आणि त्यांना मुलेदेखील होती. हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न व्हायच्याआधी धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न झाले होते. धर्मेंद्र यांना काही केल्या त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. हेमा मालिनीसोबत लग्न केल्यानंतरही धर्मेंद्र आपल्यी पहिल्या पत्नीला सोडणार नसल्याचे त्यांनी लग्नाच्या आधीच हेमा मालिनी यांना सांगितले होते. हिंदू धर्मात दोन लग्न करण्याची परवानगी नसल्याने धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारून त्यांचे नाव दिलवार ठेवले आणि हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले होते. 

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नानंतर धर्मेंद्र यांची दोन्ही मुले हेमा मालिनी यांच्यासोबत बोलत नव्हती. बॉबी आणि सनी यांनी नेहमीच हेमा मालिनी यांच्या कुटुंबाबासून दोन हात दूर राहाणेच पसंत केले आहे. मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, सनी देओल अनेक वर्षं हेमा मालिनीसोबत बोलत नव्हता. पण एका खास व्यक्तीमुळे त्याने पहिल्यांदा हेमा यांच्याशी संवाद साधला होता. ही व्यक्ती दुसरी कोणीही नसून डिम्पल कपाडिया होती. डिम्पल आणि सनी या दोघांच्या नात्याविषयी सगळ्यांना माहीत आहे. डिम्पल दिल आशना है या हेमा मालिनी दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात काम करत होती. या चित्रपटाच्या निमित्ताने हेमा मालिनी यांच्याशी सनी बोलला होता.

हेमा मालिनी यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीत देखील या गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, दिल आशना है या चित्रपटात डिम्पल आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यावर एक पॅराग्लायडिंगचे दृश्य चित्रीत करायचे होते. पण चित्रीकरणाच्या काही दिवस आधी पायलटला अपघात झाला असल्याने हा सीन करताना डिम्पल प्रचंड घाबरली होती. त्यामुळे सनी चित्रपटाच्या सेटवर येऊन हेमा यांना भेटला होता. त्यावेळी हेमा यांनी सनीची समजूत काढत त्याला सांगितले होते की, माझ्यावर विश्वास ठेव... मी डिम्पलला काहीही होऊ देणार नाही. 

 

 

 

Web Title: Dimple Kapadia was the reason why Sunny Deol started talking to Hema Malini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.