शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

शेकडाे ट्रॅक्टर्ससह शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 07:13 IST

या परेडची ड्राय रनही शेतकऱ्यांनी घेतली आहे. ‘निहंग’ समुदायातील सदस्यांनी सिंघू सीमेवर घाेड्यांवरून सुमारे १५ किलाेमीटरपर्यंत मार्च काढला. कृषी कायद्याच्या विराेधात शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकारसाेबत चर्चेची नववी फेरीही निष्फळ झाली.

नवी दिल्ली : कृषी कायद्याविराेधात आंदाेलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ‘ट्रॅक्टर परेड’साठी कंबर कसली आहे. लाखाे शेतकरी या निषेध रॅलीमध्ये सहभागी हाेणार असून त्यात हरयाणातील शेतकऱ्यांचा माेठा सहभाग राहणार आहे. त्यामुळे काेंडी टाळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आतापासून दिल्लीच्या दिशेने कूच केले आहे.

या परेडची ड्राय रनही शेतकऱ्यांनी घेतली आहे. ‘निहंग’ समुदायातील सदस्यांनी सिंघू सीमेवर घाेड्यांवरून सुमारे १५ किलाेमीटरपर्यंत मार्च काढला. कृषी कायद्याच्या विराेधात शेतकरी ठाम आहेत. केंद्र सरकारसाेबत चर्चेची नववी फेरीही निष्फळ झाली. आता शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाला पुकारलेल्या ट्रॅक्टर परेडची जंगी तयारी सुरू केली आहे. हरयाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांचा आंदाेलनामध्ये सर्वाधिक सहभाग आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर माेठ्या संख्येने ट्रॅक्टर्स आणि शेतकरी दाखल हाेत आहेत. हरयाणातील सुमारे ७ हजार गावांमधून अनेक वाहने धाडली आहेत.केवळ हरयाणातूनच १ लाख ट्रॅक्टर्स सहभागी -हाेण्याचा अंदाज आहे. दरराेज ३०० ट्रॅक्टर ट्राॅली आणि प्रत्येक ट्राॅलीमध्ये १०० ते १५० असे हजारो शेतकरी सिंघू सीमेवर दाखल हाेत आहेत. त्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या वाहनांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. 

- हरयाणातून माेठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना हाेत आहेत. त्यामुळे गर्दी आणि वाहतुकीची काेंडी वाढली आहे. याकडे पाेलिसांचे लक्ष असून गरज पडल्यास निर्णय घेऊ, असे पाेलिसांनी सांगितले. - सिंघू सीमेवरून टीकरी तसेच इतर सीमांवर निहंग समुदायातील ५० घाेडेस्वारांनी रॅली काढली. ट्रॅक्टर परेडसाठी ही एक प्रकारे ड्राय रन हाेती. शेतकरी २६ जानेवारीला ट्रॅक्टरमधून रॅली काढतील. तर आम्ही त्यांच्यासाेबत घाेड्यांवरून सहभागी हाेऊ, असे या समुदायातील सदस्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीagitationआंदोलनdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार