शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

स्नॅपचॅटवर मैत्री, मग तरुणींच्या पायांचे फोटो मागायचा तरुण, मोबाईलमध्ये सापडले १००० महिलांचे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:24 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथून सायबर क्राईमचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सोशल मीडियावर महिलांसोबत मैत्री करून त्यांच्या पायांचे फोटो मागणाऱ्या एका विकृत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथून सायबर क्राईमचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सोशल मीडियावर महिलांसोबत मैत्री करून त्यांच्या पायांचे फोटो मागणाऱ्या एका विकृत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. महिलांनी पायांचे फोटो न पाठवल्यास तो संबंधित महिलांना ब्लॅकमेल करायचा. आरोपीच्या फोनमधून एक हजारांहून अधिक महिलांच्या पायांचे फोटो सापडले आहेत. त्यामधून आरोपीच्या विकृत मानसिकतेचा उलगडा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हाथरसमधील एका तरुणीने १ फेब्रुवारी रोजी सायबर क्राईमकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं. या तरुणीने तक्रारीत लिहिलं होतं की, २४ ऑक्टोबर २०२४ रोजी एका अज्ञात व्यक्तीने तिली स्नॅपचॅटवर  फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होत. सुरुवातीला सामान्य बोलचाल झाल्यानंतर काही दिवसांनी आरोपीने अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. या तरुणीने विरोध केला तेव्हा आरोपीने चॅट व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच त्याने या तरुणीला पैशांचंही आमिष दाखवलं. 

तक्रार मिळाल्यानंतर सायबर क्राइमच्या पथकाने सक्रिय होत तपास सुरू केला. पोलिसांनी टेक्निकल इंटेलिजन्सच्या मदतीने आरोपीचं लोकेशन शोधून काढलं. तसेच या आरोपीला हाथरसमधील रुहेरी तिठ्यावरून अटक केली. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपीचं नाव दीपक शर्मा असल्याचं समोर आलं. तो अलिगडमधील रहिवासी होता. पोलिसांनी त्याचा मोबाईल चाळला असता त्यामध्ये १ हजारांहून अधिक महिलांच्या पायांचे फोटो सापडले.

पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये दीपक याला महिलांच्या पायांचे फोटो पाहण्याचा मानसिक आजार असल्याचं समोर आलं आहे. तो ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्गांनी महिलांशी मैत्री करून त्यांच्याकडे पायांचे फोटो मागायचा. जर कुण्या महिलेने त्याचं म्हणणं ऐकलं नाही तर तो त्या महिलेला धमकी देण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करायचा.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम