येथील रामकुंडालगतच्या गांधी तलावामध्ये हातपाय धुण्याचा प्रयत्नात असताना पाय घसरून पडल्याने सिडको उत्तमनगर येथील ३६ वर्षीय रहिवाशासह जुने नाशिकमधील १२ वर्षीय अल्पवयीन आणि वडाळागावातील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी (दि.३) रामकुंडावरील आदिवासी ...
कोरोनामध्ये पाच महिन्यांपूर्वी पतीचे निधन झाल्याने एकाकी आयुष्य जगणे कठीण असल्याची दोन पानी भावनिक सुसाईड नोट लिहून आपल्या सातवर्षीय चिमुकलीला महिलेने गळफास दिल्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मृत मातेविरुद्ध ...
जिल्ह्यात रविवारी (दि. ३) बाधितांची एकूण संख्या ७१ झाली असून, ५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६३९ वर पोहोचली आहे. ...
पाथर्डी शिवारातील खंडोबानगर परिसरात नव्याने सुरू झालेल्या हॉटेल रेडिसनच्या किचनमध्ये गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम चालू असताना रात्री साडेनऊच्या सुमारास गॅस स्फोट होऊन आठ कामगार भाजल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. या घटनेतील जखमी कामगाराचा उपचारादर ...
शहरात गत तीन महिन्यांपासून नाशिकमध्ये डेंग्यूबराेबरच चिकुन गुन्यासारख्या आजाराच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील संपूर्ण वर्षभरात चिकुन गुन्याचे केवळ १३ संशयित आणि ८ दूषित रुग्ण आढळले असताना यंदा सप्टेंबर महिन्यापर्यंतच तब्बल १९६७ संशयित आणि ६१० दूषित ...
नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष डॉ. शशिताई अहिरे यांची सहकार भारतीच्या प्रदेश अध्यक्षपदी आळंदी येथील अधिवेशनात निवड झाली. सहकार भारतीचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ...
गेल्या ३० तारखेपासून गंगापूर धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा किरकोळ स्वरूपात विसर्ग केला जात आहे. रविवारी सकाळपासून २८५ क्यूसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. सकाळी सुरू असलेला विसर्ग सायंकाळी ७ वाजेपर्यंत ...
शहर पोलिसांनी अंबड व मुंबईनाका परिसरातून तडीपार असलेल्या दोघा गुंडांना बेड्या ठोकल्या. संशयित उद्धव अशोक राजगिरे (२०, रा. चुंचाळे शिवार) व फकीरा रमेश बढे (२९, रा. भारतनगर) अशी ताब्यात घेतलेल्या गुंडांची नावे आहेत. ...