राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी विद्यापीठातर्फे अभ्यास मंडळाच्या बैठका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
कोरोना विषाणूचा प्रभाव पाहता बँकांच्या सर्व शाखांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर ठेवण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावर देण्यात आले आहेत. ...
विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना मार्च महिन्याचे वीज बिल मिळालेले नाही. उद्योजक चिंतेत आहेत. माहिती घेतली असता यामागचे मुख्य कारण सबसिडी असल्याचे आढळून आले. ...
औषध विक्रेत्यांकडे ‘एन-९५’ मास्कसोबतच सर्जिकल व साध्या मास्कची मागणी वाढली आहे. यामुळे गेल्या महिन्यात १० रुपयात विकलेले साधे मास्क आता १५ रुपयांत मिळत आहेत. ...
‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या विद्यार्थिनीला फटका बसला आहे. परीक्षा केंद्रावर दोन मिनिटांनी उशिरा पोहोचल्याने तिला पेपर देण्यासाठी आत सोडण्यात आले नाही. ...
गणेशपेठ बसस्थानकावर कोरोनाच्या जनजागृतीसाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे आढळल्यास अशा प्रवाशांना तपासण्यासाठी बसस्थानकावर व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. ...
कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण नागपुरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. परंतु रेल्वे प्रशासन या प्रवाशांच्या आरोग्याबाबत उदासीन असल्याची स्थिती आहे. ...
विदेशात गेलेला भारतीय प्रवासी मुंबई आणि दिल्ली विमानतळावर उतरून तेथून विमानाने नागपुरात आल्यानंतर कोरोना विषाणूच्या प्रतिबंधक तपासणीविना शहरात दाखल होत असल्याने कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
दुबई, स्वीडन, अमेरिका व जर्मनीवरून आलेल्या आठ असे एकूण २३ संशयित रुग्णांना मेयो व मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. यातील आठ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरितांच्या नमुन्यांचा अहवाल शुक्रवारी प्राप्त होणार आहे. ...