शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 06:19 IST

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही सोलापुरात दिले भविष्याचे नवे संकेत 

मुंबई : नगर परिषदा, नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेल्या सूचक विधानांमुळे राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. 

एकीकडे महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये पेटलेला संघर्ष, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेस आणि उद्धवसेनेत झालेले मतभेद. या पार्श्वभूमीवर २ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकांनंतर काय होणार आहे याची उत्सुकता ताणली गेली आहे. मालवणमध्ये शिंदेसेनेचे आ. नीलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी पैसे सापडल्याचा दावा केला. त्यावर जळगावातील भडगाव येथे पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी, ‘येत्या दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे’, असे विधान केले.  तर सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीत शरद पवार गट आणि शिंदेसेना यांच्या युतीबद्दल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, शिंदे-शिंदे एकत्र आले. ही भविष्यातील नांदी ठरू शकते.

रवींद्र चव्हाण : २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे!

येत्या दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. त्यानंतर काय ते उत्तर देईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी भडगाव (जि. जळगाव) येथे म्हटले. आ. नीलेश राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मालवणमध्ये येऊन गेल्यानंतर भाजपच्या स्थानिक  पदाधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात पैसे आल्याचे म्हटले होते. यावर पत्रकारांनी विचारले असता, चव्हाण म्हणाले, येत्या २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. मी नंतर उत्तर देईन.  

शशिकांत शिंदे : शिंदे-शिंदे एकत्र, ही भविष्याची नांदी 

शरद पवार गट आणि शिंदेसेना यांची कुर्डुवाडी नगर परिषदेत झालेली निवडणूकपूर्व युती भविष्यातील नांदी ठरू शकते, असे वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी कुर्डुवाडी येथील सभेत केले. ते म्हणाले, एकनाथ शिंदेंचा केवळ वापर करून घेतला. लढणारी माणसे कधीच शरणागती पत्करत नसतात. कुर्डुवाडीमध्ये तुम्ही लोक आज एकत्र आलाय ही कदाचित भविष्याच्या राजकारणाची नांदी ठरेल.  

टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकRavindra Chavanरविंद्र चव्हाणBJPभाजपाShashikant Shindeशशिकांत शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे