शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 10:01 IST

Mahim, Worli Assembly Election 2024 Result Live Updates: २८८ पैकी एक हायव्होल्टेज मतदारसंघ असलेल्या माहीममध्ये दुसऱ्या फेरीचा कल हाती आला आहे.

Mahim, Worli Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live:  विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता वेग आला असून पहिल्या काही फेऱ्यांचे कल हाती आले आहेत. २८८ पैकी एक हायव्होल्टेज मतदारसंघ असलेल्या माहीममध्ये राज ठाकरेंचा पूत्र अमित ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. तर सदा सरवणकर हे दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. 

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स

दुसऱ्या फेरीचा कल हाती आला आहे. यामध्ये अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर तर उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत हे पहिल्या क्रमांकावर आले आहेत. आधीच्या फेरीत अमित ठाकरे आघाडीवर होते. नंतर सरवणकर आघाडीवर होते. एकंदरीतच शेवटच्या फेरीपर्यंत मोठी उलथापालथ या मतदारसंघांत पहायला मिळणार आहे. 

वरळीतून शिंदे गटाचे मिलिंद देवरा हे पिछाडीवर आहेत. तर आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला शनिवारी होणार असून, महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्तेत येणार, याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. या निमित्ताने राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांपैकी ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी मतदानाचा हक्क २० नोव्हेंबरला बजावला होता. मतदानाची टक्केवारी ६६.०५ इतकी होती. १५८ लहान-मोठे पक्ष आणि अपक्ष असे मिळून ४ हजार १३६ उमदेवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेmahim-acमाहीमAditya Thackreyआदित्य ठाकरेworli-acवरळी