शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर आदित्य ठाकरेंना देणार मदतीचा हात; नितेश राणेंची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 19:29 IST

Maharashtra Election Result 2019 पुन्हा रंगणार राणे विरुद्ध ठाकरे सामना?

मुंबई: शिवसेना आणि राणे कुटुंब यांच्यातलं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. राणे आणि ठाकरे यांच्यातला 'सामना' महाराष्ट्रानं पाहिला आहे. आता राणेंची दुसरी, तर ठाकरेंची तिसरी पिढी विधानसभेत दिसणार आहे. त्यामुळे विधानसभेत राणे आणि ठाकरेंचे एकमेकांवरील 'प्रहार' पाहायला मिळणार का, याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना नितेश राणेंना प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला त्यांनी अतिशय सावधपणे उत्तर दिलं. आदित्य यांच्या रुपात ठाकरे कुटुंबातील व्यक्ती प्रथमच निवडणुकीच्या आखाड्यात उतरली होती. त्यांनी वरळीतून मोठा विजय मिळवला. त्यामुळे आता आदित्य विधानसभेत दिसतील. विधानसभेत आदित्य ठाकरे यांच्यासोबतचा संवाद कसा असेल, असा प्रश्न नितेश राणेंना विचारला गेला. त्यावर त्यांना कामकाज शिकायला मी मदत करेन, असं उत्तर राणेंनी दिलं. 'विधानसभेच्या कामकाजाचे काही नियम असतात. संसदीय कामकाजात काही आयुधांचा वापर करावा लागतो. याबद्दलची माहिती मी आदित्य यांना देऊ शकतो. अर्थात त्यांनी मदत मागितली, तरच मी त्यांना सहाय्य करेन,' असं नितेश राणे यांनी सांगितलं. कणकवलीत भाजपाच्या नितेश राणेंनी जवळपास 30 हजार मतांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांचा पराभव केला. महायुती असतानाही शिवसेनेनं कणकवलीत उमेदवार दिला होता. त्यामुळे कणकवलीतल्या लढतीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनीवरळीत 67 हजार मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे आदित्य यांना तब्बल 70 टक्के मतं मिळाली.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aditya Thackreyआदित्य ठाकरेNitesh Raneनीतेश राणे kankavli-acकणकवलीworli-acवरळी