शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 09:24 IST

Maharashtra Assembly Election 2024 : शरद पवार आणि उद्धव ठाकरे गुजरातचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहात. त्यामुळे गुजरात सरकारला जाहिरात करायची गरज नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

Maharashtra Assembly Election 2024 : पिंपरी : अलीकडे फेक नॅरेटिव्हची फॅक्टरी सुरू झाली आहे आणि शरद पवार यांच्यासारखे नेते या फॅक्टरीचे मालक असल्यासारखे वागायला लागले आहेत. ते सांगतात की, सगळे उद्योग गुजरातला गेले. खरंतर जेवढी परकीय गुंतवणूक भारतात झाली, त्यातील ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. त्यामुळे आश्चर्य याचे वाटते की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे गुजरातचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे गुजरात सरकारला जाहिरात करायची गरज नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि.६) काळेवाडी फाटा येथील मैदानावर सभा झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.फडणवीस म्हणाले, २०१४ला आपले सरकार आले. आमच्या काळात महाराष्ट्र एक नंबरला होता. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्या वर्षी कर्नाटक एक नंबरला गेले. दुसऱ्या वर्षी गुजरात गेले. आम्ही सरकार आल्यानंतर महाराष्ट्राला नंबर एकवर नेऊ, असे २०२३ मध्ये सांगितले होते. आता महाराष्ट्र नंबर एकवर आहे.

याचबरोबर, सुप्रिया सुळे या फेक नरेटिव्ह फॅक्टरीच्या डायरेक्टर आहेत. त्या म्हणाल्या हिंजवडी आयटी हबमधून कंपन्या स्थलांतरित झाल्या. मात्र, हिंजवडीतील उद्योगांचे स्थलांतर होत आहे, असा चुकीचा प्रचार केला जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात सर्वाधिक उद्योग बाहेर गेले आहेत. आमच्या काळात उद्योग शहराबाहेर गेले आहेत, ते राज्याबाहेर गेले नाहीत. मात्र त्याबाबत सुप्रिया सुळे विनाकारण फेक नरेटिव्ह निर्माण करत आहेत. शरद पवार यांच्यासारखे नेते फेक नॅरेटिव्हच्या फॅक्टरीचे मालक आहेत. आम्ही नवीन योजना आणल्या. त्यातून दहा लाख तरुणांना रोजगार देणार आहोत. २५ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत. ज्यामध्ये दहा लाख तरुणांसाठी दहा हजार रुपये सरकार खर्च करेल आणि तरुणांना प्रशिक्षण देईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंचे पोटातील ओठात आले - फडणवीस आम्ही लाडक्या बहिणींना सत्ता आल्यावर २१०० रुपये देणार आहोत. आम्ही सख्खे भाऊ आहोत, त्यामुळं सावत्र भावांचा याला विरोध आहे. न्यायालयात जाऊन या सावत्र भावांनी ही योजना बंद पाडण्याचे प्रयत्न केले. मात्र, आम्ही न्यायालयात योग्य पद्धतीने मांडणी केली आणि योजना राबवली. आता तर उद्धव ठाकरे म्हणाले की, महायुती सरकारने लागू केलेल्या योजना बंद पाडणार. याचा अर्थ लाडकी बहीण योजना ते सर्वात आधी बंद करणार. त्यांच्या पोटातील ओठात आले आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधाला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेchinchwad-acचिंचवडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस