शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मी अडीच महिन्यांसाठी देखील मुख्यमंत्री होऊ शकतो; अजित पवारांचे फडणवीसांसमोरच वक्तव्य, अन् चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 07:57 IST

Ajit pawar on CM Post Statement: फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ मंत्री झाले असून एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे. 

राज्यात महायुतीचे प्रबळ सरकार स्थापन झाले आहे. प्रचंड बहुमत असलेल्या या सरकारमधील मंत्र्यांचा अगदी हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शपथविधी झाला. यावेळी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ मंत्री झाले असून एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे. 

शपथ घेतलेल्या ३३ कॅबिनेट मंत्र्यांमध्ये भाजपचे १९ शिंदेसेनेचे ११ आणि अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे.  पश्चिम महाराष्ट्राला सर्वात जास्त १० मंत्रिपदे मिळाली. त्या खालोखाल विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला प्रत्येकी आठ मंत्रिपदे मिळाली. शिंदे सरकारमधील १२ मंत्र्यांचा पत्ता कापण्यात आला. यामुळे काहीशी नाराजी असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मंत्रिपद २.५ वर्षांचेच असल्याचे स्पष्ट केले आहे. 

जास्त आमदार निवडून आल्याने, तसेच तीन पक्षांत मंत्रिपदे वाटली गेल्याने सर्वांनाच संधी मिळालेली नाही. जुन्या चेहऱ्यांना वगळून २० नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अजित पवार मुख्यमंत्री कधी होतील असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर अजित पवारांनी अडीज वर्षांच्या मंत्रिपदाचा धागा पकडत मी अडीच महिन्यासाठी देखील मुख्यमंत्री होऊ शकतो, असे सांगितले. अजित पवारांच्या या उत्तराने हशा पिकला असला तरी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. 

छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण

अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही. यामुळे भुजबळ कमालीचे संतप्त झाले असून, त्यामुळेच ते मेळाव्याला उपस्थित राहिले नसल्याची चर्चा मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये होती. या घडामोडीमुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून, नागपूरच्या बोचऱ्या थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४