शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 19:29 IST

Exit Poll of Maharashtra Latest Update: बहुतांशी एक्झिट पोलचे आकडे हे कोणाला निर्विवाद बहुमत मिळताना दाखवत नाहीत. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ जागा लागणार आहेत. दोन्ही युती आघाडी याच काठावर पास होताना दिसत आहेत.

राज्याचे मतदान थोड्या वेळापूर्वीच संपले. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कटेंगे तो बटेंगे, सोयाबिन, कापूस, लाडकी बहीण योजना या मुद्द्यांभोवतीच घुटमळत होती. महायुती आणि मविआ हे मुद्दे आपल्या बाजुने कसे वळतील याचा प्रयत्न करत होते. अखेर मतदान संपले आणि एक्झिट पोल आले आहेत. या एक्झिट पोलनुसार एक मात्र नक्की आहे की भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे, तर काँग्रेस सर्वाधिक फायद्यात असलेला पक्ष ठरणार आहे. 

Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...

दैनिक भास्करनुसार बहुतांशी एक्झिट पोलचे आकडे हे कोणाला निर्विवाद बहुमत मिळताना दाखवत नाहीत. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ जागा लागणार आहेत. दोन्ही युती आघाडी याच काठावर पास होताना दिसत आहेत. सरासरी भाजपाला ८०-९० जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजे गेल्यावेळपेक्षा भाजपाला १५-२५ जागांवर नुकसान होताना दिसत आहे. 

दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष राहणार असून या पक्षाला ५८-६० जागा मिळताना दिसत आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. शरद पवारांनाही मोठा फायदा होताना दिसत आहे. यावेळच्या एक्झिट पोलमध्ये त्यांना ५०-५५ जागांवर जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अजित पवार गेल्यानंतर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे आमदार शरद पवारांकडे होते. 

उद्धव ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला प्रत्येकी ३०-३५ जागांवरच स्पर्धा करताना दाखविण्यात येत आहे. तर अजित पवारांचे प्रचंड नुकसान होताना दिसत आहे. राष्ट्रवादीला 15-20 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. अजित पवारांना हा मोठा फटका आहे. 

बाकी अपक्ष, छोट्या पक्षांना, महाशक्तीला २०-२५ जागा मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेची खरी चावी याच लोकांकडे असणार आहे. राज ठाकरेंच्या मनसेचे २-४ उमेदवार जिंकू शकतात, असा अंदाज आहे. सपाला १ जागा मिळताना दिसत आहे. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार