शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार परिषदेच्या तपासाला केंद्र सरकारचा 'उत्कृष्ट तपास' पुरस्कार;राज्यातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 22:00 IST

एल्गार परिषदेच्या तपासावरून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात पडली होती वादाची ठिणगी

ठळक मुद्देदेशभरात १२१ पोलीस अधिकाना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट तपास पदक देऊन गौरव करण्यात येणार

पुणे : संपूर्ण देशभरात गाजलेल्या व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तपास करण्यावरुन केंद्र सरकारराज्य सरकार यांच्यात वादाची ठिणगी पडलेल्या एल्गार परिषदेच्या तपास करणारे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना केंद्र सरकारचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे. देशभरात १२१ पोलीस अधिकाना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट तपास पदक देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुण्यातील गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ़ शिवाजी पवार यांच्याकडे एल्गार परिषदेचा तपास होता़ नक्षलवाद्यांशी संबंध असल्यावरुन देशभरात विविध शहरात छापे घालण्यात आले होते. डॉ. शिवाजी पवार यांच्याकडे जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२० असा २ वर्षे या गुन्ह्याचा तपास होता. या तपासासाठी मोठे पथक कार्यरत होते.या तपासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसे पत्र राज्य शासनाला लिहिले होते. त्यानंतर केंद्र सरकारने अचानक पुढाकार घेऊन हा तपास एनआयएकडे वर्ग केला. त्यावरुन केंद्र व राज्य शासनाबरोबरच महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते त्यांच्यातील वाद रंगला होता. केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे देण्याचे जाहीर करताच दुसºया दिवशी एनआयएचे अधिकारी मुंबईहून पुण्यात दाखल झाले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर टिका केली होती. मात्र, केंद्र सरकारच्या कायद्यामुळे राज्य सरकारला या गुन्ह्याचा तपास  एनआयए कडे द्यावा लागला होता. त्यानंतर आता तब्बल ६ महिन्यांनंतर केंद्र सरकारने एल्गार परिषदेच्या तपासाचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल डॉ. शिवाजी पवार यांचा केंद्रीय गृहमंत्री यांचे उत्कृष्ट तपास पदक देऊन गौरव केला जाणार आहे. राज्यातील पुरस्कार प्राप्त अधिकारी : डॉ. शिवाजी पवार (सहायक पोलिस आयुक्त), राजेंद्र बोकडे (पोलिस निरीक्षक), उत्तम सोनवणे (पोलिस निरीक्षक), नरेंद्र हिवरे ( वरिष्ठ पोलिस निरीक्षक), ज्योती क्षीरसागर (पोलिस अधीक्षक), अनिल घेरडीकर (पोलिस उपअधीक्षक), नारायण शीरगावकर (पोलिस उपअधीक्षक), समीर शेख (सहायक पोलिस आयुक्त), किसन गवळी (सहायक पोलिस आयुक्त), कोंडीराम पोपेरे (पोलिस निरीक्षक)़़़़़़़़़़़़एकाच पदावर काम करणाऱ्या दोनअधिकाऱ्यांचा गौरवडॉ. शिवाजी पवार हे सध्या गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहे. त्यांच्याअगोदर या ठिकाणी समीर शेख कार्यरत होते. त्यांची नाशिक येथे बदली झाली. तेथील मुथुट फायनान्सच्या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल त्यांना केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे़ पुण्यातील एकाच पदावर काम केलेल्या दोन अधिकाऱ्यांचा एकाचवेळी गौरव होण्याचा दुर्मिळ योगायोग आहे.

टॅग्स :PuneपुणेElgar morchaएल्गार मोर्चाState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारPoliceपोलिसSharad Pawarशरद पवार