रुग्णालय प्रशासनाने त्या महिलेच्या कानांतील कर्णफुले व पायांतील जोडवी काढून नातेवाइकांकडे दिली; पण त्यांच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र व दोन्हीही हातांत एकूण दोन सोन्याच्या पाटल्या होत्या. ...
कोल्हापूर परिक्षेत्रातील पुणे ग्रामीणमध्ये २०१४ मध्ये सलग तीन वर्षे पोलीस अधीक्षक पदाची धूरा सांभाळलेले मनोज लोहिया यांच्याकडे आता संपूर्ण कोल्हापूर परिक्षेत्राची धूरा आली आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांची सोयीप्रमाणे ही बदली झाली ...
हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीवर प्रशासक नियुक्ती झाली आहे. वस्त्रोद्योग आयुक्त व अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था डॉ. माधवी खोडे यांनी ही कारवाई १ सप्टेंबरला केली आहे. ...
कोरोनाग्रस्त मृत महिलेच्या हातातील सुमारे एक लाख रुपये किमतीच्या चार तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या रुग्णालयातून अज्ञाताने चोरल्याचा प्रकार घडला. तो शिवाजी पार्कमधील एका नामवंत रुग्णालयामध्ये घडला. या चोरीबाबत मृत महिलेच्या मुलाने गुरुवारी शाहूपुरी ...
आख्खा दिवस घामाच्या धारांमध्ये न्हाऊन निघाल्यानंतर गुरुवारची मध्यरात्र ढगफुटीसदृश पावसामुळे जागून काढण्याची वेळ जिल्ह्यावर आली. गडगडाटासह आलेल्या या तुफानी पावसामुळे नागरिकांचा थरकाप उडाला. पन्हाळा व करवीर तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. त्य ...
शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांची पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (पीआरसीआय)) या राष्ट्रीय संस्थेच्या पश्चिम विभागाच्या सहसचिव पदावर निवड झाली आहे. या विभागाअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण व दीव, छत्तीसगढ आणि ओडिशा ...
वळिवडे (ता. करवीर) येथील आक्काताई आप्पासाहेब कोळी (वय ७०) व रत्नाबाई बापू कोळी (वय ७६) या सख्ख्या जावांचे अनुक्रमे शुक्रवारी (दि. २८) व शनिवारी (दि. २९ ऑगस्ट) निधन झाले. त्यांच्या एकापाठोपाठ जाण्याने वळिवडे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या प ...
न्यायसंकुलासह, न्यायनगरीत कोरोनाने शिरकाव केल्याने आता त्याचा न्यायालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. काही न्यायाधीश, कर्मचारी, वकीलवर्गासह कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे न्यायालयीन अडचणी वाढू शकतात. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज सकाळी १० ते दुपारी १ या एका स ...
कोरोनामुळे सुरू असलेल्या गेल्या सहा महिन्यांच्या लॉकडाऊन काळात कोल्हापुरातील १ लाख ४२ हजार ४३० नागरिकांना ई-पास सेवेद्वारे अन्य जिल्ह्यांत जाता आले आहे. या कामात महसूल विभागातील दहाहून अधिक कर्मचारी राबत होते. आता ई-पास सेवा रद्द झाल्याने त्यांची यात ...
शिवाजी विद्यापीठात कवला किंवा कवळा (विज्ञानातील नाव : स्मिथिया हिऱ्सुता) या आकर्षक गवत फुलाची वनस्पती फुलली आहे. ही फुले कासच्या पठारावर फुलणाऱ्या फुलांची आठवण करून देत आहेत. ...