परिक्षेत्रात यापूर्वी काम केल्याचा लोहिया यांना होणार फायदाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 07:52 PM2020-09-03T19:52:39+5:302020-09-03T22:52:55+5:30

कोल्हापूर परिक्षेत्रातील पुणे ग्रामीणमध्ये २०१४ मध्ये सलग तीन वर्षे पोलीस अधीक्षक पदाची धूरा सांभाळलेले मनोज लोहिया यांच्याकडे आता संपूर्ण कोल्हापूर परिक्षेत्राची धूरा आली आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांची सोयीप्रमाणे ही बदली झाली म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

Lohia will benefit from having worked in the field before | परिक्षेत्रात यापूर्वी काम केल्याचा लोहिया यांना होणार फायदाच

परिक्षेत्रात यापूर्वी काम केल्याचा लोहिया यांना होणार फायदाच

googlenewsNext
ठळक मुद्देपरिक्षेत्रात यापूर्वी काम केल्याचा लोहिया यांना होणार फायदाच डॉ. सुहास वारके यांचे काम कोल्हापूरात पण मन मुंबईत

तानाजीपोवार

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रातील पुणे ग्रामीणमध्ये २०१४ मध्ये सलग तीन वर्षे पोलीस अधीक्षक पदाची धूरा सांभाळलेले मनोज लोहिया यांच्याकडे आता संपूर्ण कोल्हापूर परिक्षेत्राची धूरा आली आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांची सोयीप्रमाणे ही बदली झाली म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

कोल्हापूर परिक्षेत्रातील साताऱ्यामध्ये १९८८ मध्ये परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक, पुणे ग्रामीणमध्ये २०१४ मध्ये सलग तीन वर्षे पोलीस अधीक्षकपदाची धुरा सांभाळलेले मनोज एस. लोहिया यांच्याकडे आता संपूर्ण कोल्हापूर परिक्षेत्राची धुरा आली. नांदेड येथे त्यांच्यासाठी कौटुंबिक अडचण होती. त्यांना विनंतीनुसार कोल्हापूर मिळाल्याने ते तितक्याच प्रखरपणे काम करतील, अशी अपेक्षा आहे.

गेले दीड वर्ष कोल्हापूर परिक्षेत्राची धुरा सांभाळताना विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी चांगले काम केले; पण त्यांचे पूर्ण कुटुंबच मुंबईत राहत असल्याने त्यांचे कर्तृत्व कोल्हापुरात व मन नेहमी मुंबईकडेच आडकलेलेच असायचे. त्यामुळे त्यांच्या सोयीप्रमाणे ही बदली झाली म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मूळचे जालनाचे असलेले मनोज लोहिया यांची नांदेड परिक्षेत्रातून कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली. त्यांना नांदेड सोडायचे होते, तेथे त्यांची कौटुंबिक अडचण मोठी असल्याने त्यांना पुणे अगर मुंबई येथे काम करायचे होते, पण कोल्हापूर हा पुण्याचा भाग असल्याने येथे चांगले काम करून दाखवेन अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सातारा येथे १९८८ मध्ये परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून एक वर्ष, तर २०१२ ते २०१५ मध्ये त्यांनी कोल्हापूर परिक्षेत्रात पुणे ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षकपदावर चांगली कामगिरी केली आहे. त्यांना या परिक्षेत्राची संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे त्यांना काम करणेही सोपे जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या विनंतीनुसार त्यांना कोल्हापूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे.

पुढीलआठवडाअखेरीसघेणारपदभार

नवे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना पोलीस महासंचालकांनी येत्या दोन दिवसांत नांदेड येथून पदभार सोडण्यास सांगितले. ते कोल्हापूर परिक्षेत्राचा मंगळवारी (दि. ८) पदभार घेतील अन्यथा पुढील आठवड्याच्या अखेरीस पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Lohia will benefit from having worked in the field before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.