शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election Results 2026: सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने मदत मागितली तर विचार करू - सतेज पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:21 IST

काँग्रेसने मिळविलेले यश समाधानकारकच; पुढची खेळी आता कशी सांगणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीला आमची गरज पडेल असे वाटत नाही. महायुतीतील घटक पक्षांना ते सोबत घेतील. मात्र, त्यातूनही काही वेगळं होऊन सत्तास्थापनेसाठी त्यांनी काँग्रेसकडे मदत मागितली तर विचार करू, अशी भूमिका काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मांडली. जिल्ह्यात महायुतीचे दहा आमदार, दोन मंत्री, एक खासदार व सत्ता असतानाही काँग्रेसने मिळविलेले यश समाधानकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सतेज पाटील म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने १५, स्वाभिमानी, उद्धवसेना व शिवशाहू आघाडीचा प्रत्येकी १, अशा १८ जागा जिंकल्या आहेत. जिल्ह्यात महायुतीचे दहा आमदार, दोन मंत्री आहेत. तिन्ही पक्षांची ताकद एकवटली असतानाही काँग्रेसने मिळविलेले यश समाधानकारक आहे.

महाडिकांनी गोकुळकडे व्यवसाय म्हणून बघितले

सहकारातील निवडणुका वेगळ्या असतात. गोकुळ, जिल्हा बँक या संस्था चांगल्या चालविल्या आहेत. त्यामुळे या संस्थांमध्ये पक्षविरहित राजकारण असेल, असेही आमदार पाटील म्हणाले. गोकुळमध्ये आम्ही शेतकऱ्यांचे हित पाहतो, महाडिकांनी मात्र गोकुळकडे व्यवसाय म्हणून बघितले, असा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला.

पुढची खेळी आता कशी सांगणार

करवीर तालुक्यातील १२ जागांपैकी ५ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला आहे. पुढच्या विधानसभेसाठी ही तयारी आहे का? असा प्रश्न विचारताच आमदार पाटील यांनी माझी विधानपरिषदेची मुदत डिसेंबर २०२७ पर्यंत आहे. त्यामुळे पुढची खेळी आता कशी सांगणार, असे म्हणत प्रश्नाला बगल दिली. करवीर मतदारसंघात अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी चांगली मते घेतल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

पाटील, सूर्यवंशींना आमचे प्रस्ताव, पण...

गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाचा पाडळीमधून पराभव झाला असला तरी पाटील यांना पाडळीतून व राजेंद्र सूर्यवंशी यांना सांगरूळमधून लढण्याचा प्रस्ताव होता. ते आमच्याकडून उभारले असते तर या दोन्ही जागा आरामात जिंकल्या असत्या. मात्र, पाटील यांना शिंदेसेनेच्या बाजूची समीकरणे वाटल्याने त्यांनी तो निर्णय घेतला. पण शेवटी लोकांनाही काही निर्णय मान्य असावे लागतात. ते ५० वर्षे काँग्रेससोबत राहिले होते, अचानक पक्ष बदलल्याने त्याचा फटका त्यांना बसला असेल, असे आमदार पाटील म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP: Congress open to supporting NCP for power in 2026.

Web Summary : Satej Patil stated Congress will consider supporting NCP in Kolhapur ZP if needed for power. Congress's 15 seats are satisfactory despite MahaYuti's strength. He criticized Mahadik's view of Gokul as a business. Patil also hinted at future plans post-2027.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस