Kolhapur ZP Election Results 2026: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला स्पष्ट बहुमत; राष्ट्रवादीची धमाकेदार कामगिरी, काँग्रेसही पडलं भारी

By समीर देशपांडे | Updated: February 9, 2026 18:13 IST2026-02-09T18:12:25+5:302026-02-09T18:13:20+5:30

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय काेरे, शिवाजीराव पाटील, चंद्रदीप नरके यांना त्यांच्या मतदारसंघात मोठा फटका बसला

Kolhapur ZP Election Results 2026 Mahayuti gets clear majority in Kolhapur district; NCP impressive performance, Congress also suffered a heavy defeat | Kolhapur ZP Election Results 2026: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला स्पष्ट बहुमत; राष्ट्रवादीची धमाकेदार कामगिरी, काँग्रेसही पडलं भारी

Kolhapur ZP Election Results 2026: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला स्पष्ट बहुमत; राष्ट्रवादीची धमाकेदार कामगिरी, काँग्रेसही पडलं भारी

कोल्हापूर :  जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी ५१ जागी महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. जर महायुतीमध्येच काही वांदे झाले नाही तर जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता नक्की आहे. सर्वाधिक २० जागा मिळवून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाने स्थापनेपासूनची उच्चांकी कामगिरी नोंदवली. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली १४ जागा जिंकून कॉंग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिली.

या निवडणुकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जनसुराज्यचे आमदार विनय काेरे, भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील, शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांना त्यांच्या मतदारसंघात पराभवाचा मोठा फटका बसला. नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकीत एकतर्फी सत्ता मिळवणाऱ्या महायुतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही बाजी मारली आहे. सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा दावेदार असून दोनच दिवसात नेत्यांच्या बैठका सुरू होणार आहेत. 

एकूण जागा - ६८

  • राष्ट्रवादी (अजित पवार पक्ष) -२०
  • कॉंग्रेस : १४
  • भाजप : १२
  • शिंदेसेना : ०९
  • जनसुराज्य : ०५
  • यड्रावकर शाहू आघाडी : ०४
  • उद्धवसेना : ०१
  • स्वाभिमानी : ०१
  • शिवशाहू आघाडी-०१
  • अपक्ष : ०१

Web Title : कोल्हापुर ZP चुनाव में महायुति को स्पष्ट बहुमत; एनसीपी का शानदार प्रदर्शन

Web Summary : कोल्हापुर ZP की 68 में से 51 सीटें महायुति ने जीतीं। हसन मुश्रीफ के नेतृत्व वाली एनसीपी को 20 सीटें मिलीं, कांग्रेस को 14. कई नेताओं को हार का सामना करना पड़ा। एनसीपी अध्यक्ष पद की प्रबल दावेदार है।

Web Title : Mahayuti Secures Clear Majority in Kolhapur ZP Election; NCP Shines

Web Summary : Mahayuti won 51 of 68 Kolhapur ZP seats. NCP, led by Hasan Mushrif, secured 20 seats, followed by Congress with 14. Several leaders faced setbacks. NCP is the frontrunner for the president post.