शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 25 जणांचा मृत्यू, 830 जणांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 15:07 IST

चीनमध्ये कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देचीनमध्ये कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे.व्हायरसमुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. 830 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे.

बीजिंग - चीनमध्येकोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 830 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. व्हायरसमुळे चीनने वुहान आणि हुआंगगांग ही दोन शहरे बंद करून टाकली आहेत. तेथील रहिवाशांना कारणाविना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. तसेच तेथील वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. चीनमध्ये वेगाने व्हायरस पसरल्यानंतर भारत, अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये व्हायरससाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

कोरोना व्हायरस सापातून माणसामध्ये संक्रमित झाल्याची शक्यता तेथील संशोधकांनी व्यक्त केली आहे. वुहान आणि हुआंगगांग या दोन्ही शहरांमध्ये बाहेरील लोकांना जायलाही सध्या परवानगी मिळणार नाही, असे तेथील सरकारने स्पष्ट केले आहे. या शहरांतील चित्रपटगृहे, दुकाने मॉल, बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. कमी कालावधीत जास्तीत जास्त लोक या आजाराने ग्रस्त होत असल्याने चीन सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे बळी गेलेल्यांमध्ये बहुतांश नागरिक वुहान व हुआंगगांग या शहरांतील असल्याने तेथील परिस्थितीवर चीन तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत.या शहरांत आवश्यकता असेल तरच जावे, अशी सूचना भारताने आपल्या नागरिकांना केली आहे. मात्र त्या शहरांत बाहेरील लोकांना तूर्त जाता येणार नाही.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी या व्हायरसवर कंट्रोल मिळवण्याचे आदेश दिले आहेत. व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. शी जिनपिंग यांनी 'वुहान आणि इतर ठिकाणांवर नुकत्याच झालेल्या नवीन कोरोना व्हायरस न्यूमोनियाची दखल गंभीरतेने घेणे गरजेचे आहे. सर्व सरकारी कार्यालये, दवाखाने संबंधित विभागांनी लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्राधान्य द्यायला हवं' असं म्हटलं आहे. लॉस एन्जेलिस टाइम्सच्या वृत्तानूसार, चीननंतर हा घातक व्हायरसने  थायलॅंड आणि जपानमध्येही आपले पाय पसरले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका रिपोर्टनुसार, हा व्हायरस वेगाने पसरत आहे आणि अनेकांचा जीव गेला आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

चीनसोबतच भारत सरकारनेही कोरोना व्हायरसबाबत दुजोरा दिला आहे. भारतात हा व्हायरस पसरू नये यासाठी एअरपोर्टवर प्रवाशांची मेडिकल टेस्ट केली जात आहे. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, Severe acute respiratory syndrome किंवा SARS निमोनियाचं घातक रूप आहे. थायलँड आणि जपानमध्येही कोरोन वायरसची तीन प्रकरणे पुढे आली आहेत. साउथ कोरियामध्येही या व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. 35 वर्षाची चीनी महिला वुहानमधून सियोलला आली होती. अमेरिकेतील विमानतळावरही चीनमधून येणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Ind vs NZ, 1st T20 Live : भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा आऊट

Maharashtra Bandh Live: वंचित आघाडीच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीहल्ला; अमरावतीत प्रचंड तणाव  

'मोटा भाई-छोटा भाईच्या तोंडी हिटलरची भाषा', मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

'पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांगलादेशींना ओळखलं', भाजपा नेत्याचं अजब विधान

'कानाला आताच त्रास होतो आहे का?'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा

 

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनdoctorडॉक्टरDeathमृत्यू