bhupesh baghel says pm modi and amit shah speaking the language of hitler | 'मोटा भाई-छोटा भाईच्या तोंडी हिटलरची भाषा', मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

'मोटा भाई-छोटा भाईच्या तोंडी हिटलरची भाषा', मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

ठळक मुद्देबघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची तुलना ही जर्मनीचा हुकूमशाह हिटलरशी केली आहे. 'मोटा भाई' आणि 'छोटा भाई' असा त्यांचा उल्लेख केला आहे.

रायपूर - छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते भूपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. भूपेश बघेल यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची तुलना ही जर्मनीचा हुकूमशाह हिटलरशी केली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचं नाव न घेता त्यांनी 'मोटा भाई' आणि 'छोटा भाई' असा त्यांचा उल्लेख केला आहे. बघेल यांनी हिटलरच्या एका भाषणाचा उल्लेख करत मोदी आणि शहा या दोघांच्या तोंडी त्याची भाषा असल्याचं म्हटलं आहे. 

'हिटलरने आपल्या एका भाषणात मला हव्या तितक्या शिव्या द्या पण जर्मनीला शिवी देऊ नका असं म्हटलं होतं. मोटा भाई आणि छोटा भाईदेखील सारखीच गोष्ट बोलत आहेत. ते देखील याच प्रकारची भाषा सध्या बोलत आहेत' असं भूपेश बघेल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी बघेल यांनी एनआरसीवरून ही टीका केली होती. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात एनआरसीवरून मतांतर असून ते देशाला सहन करावं लागत असल्याचं म्हटलं होतं. रायपूरच्या इंडोर स्टेडियममध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. 'अमित शहा म्हणतात एनआरसी लागू होणार, तर पंतप्रधान म्हणतात एनआरसी लागू होणार नाही. प्रश्न उपस्थित होतो की, नेमकं खरं कोण बोलत आहे आणि खोटं कोण बोलत आहे. पंतप्रधान म्हणतात ते योग्य मानायचं की केंद्रीय गृहमंत्री म्हणतात ते मानायचं' असं बघेल यांनी म्हटलं होतं. 

बेरोजगारी आणि महागाईवरून देखील भूपेश बघेल यांनी टीकास्त्र सोडलं होतं. 'आज देशात महागाई, बेरोजगारी आहे पण त्याची कुठेही चर्चा होताना दिसत नाही. सर्व चर्चा नागरिकतेवर होत आहे. तुम्ही भारताचे नागरिक आहात का? हा प्रश्न सर्वात अपमानित करणारा आहे. आपल्या आई-वडिलांची जन्मतारीख विचारलं तर किती जण सांगू शकणार आहेत? छत्तीसगडमधील अनेक लोक गरीब असून त्यांच्याकडे जमीनदेखील नाही. त्यांचे आई-वडील निरक्षर आहेत' असं त्यांनी म्हटलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या 

Ind vs NZ, 1st T20 Live : भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली

Maharashtra Bandh Live: हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी केलं शांततेचं आवाहन

उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांचे फोन टॅपिंग प्रकरणी सरकारकडून चौकशीचे आदेश

'मी मुख्यमंत्री होईन असे वचन बाळासाहेबांना कधीही दिले नव्हते पण...'

 

Web Title: bhupesh baghel says pm modi and amit shah speaking the language of hitler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.