ट्विशा शर्मा प्रकरणात एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या फुटेजमध्ये ट्विशा शर्मा छताच्या दिशेने जाताना दिसत आहे. त्यानंतर काही वेळाने तिचा पती समर्थ सिंह आणि इतर दोन जण ट्विशाला (मृत्यूनंतर) जिन्यावरून खाली आणताना दिसत आहेत. सीसीटीव्हीमध्ये हे देखील स्पष्ट दिसत आहे की, जिन्यावरच ट्विशाला सीपीआर (CPR) देण्यात आला.
मॉडेल ट्विशाने १२ मे रोजी आत्महत्या केली होती. भोपाळमधील सासरच्या घरी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. रात्रीच्या वेळी संशयास्पद परिस्थितीत तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला सापडला होता. घटनेच्या रात्रीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिचा पती समर्थ सिंह आणि इतर दोन लोक ट्विशाला जिन्यावरून खाली घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहेत.
"समर्थ ट्विशाचा मानसिक छळ करायचा"
ट्विशा शर्माच्या आईने म्हटलं आहे की, ''आम्हाला न्यायाची कोणतीही अपेक्षा नाही. ट्विशा नाही, तर समर्थ स्वतः ड्रग्ज घ्यायचा आणि तिचा मानसिक छळ करायचा, तिला घाणेरड्या शिव्या द्यायचा. ट्विशाच्या वडिलांनी समर्थला ड्रग्ज घेण्याबाबत विचारणा केली होती, याच कारणावरून तिच्या वडिलांना नाक घासून माफी मागण्यास भाग पाडलं गेलं होतं.''
"हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
"आमचा तपासावर विश्वास नाही"
ट्विशा शर्माच्या आईने पुढे सांगितलं की, आमचा या पोलीस तपासावर अजिबात विश्वास नाही. बक्षीस जाहीर करणं किंवा पासपोर्ट जप्त करण्याची कारवाई आधीच व्हायला हवी होती. आमची अशी इच्छा आहे की हे प्रकरण दिल्लीत ट्रान्सफर करण्यात यावं आणि तिचे पुन्हा एकदा पोस्टमार्टम केले जावे.
"हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
ट्विशाची हत्या केल्याचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेल ट्विशा शर्माची भेट भोपाळचा रहिवासी असलेल्या समर्थ नावाच्या वकिलासोबत २०२४ मध्ये एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये दोघांनी लग्न केलं होतं. आता ट्विशाच्या माहेरच्या लोकांनी तिचा पती समर्थ आणि सासूवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. तसेच ट्विशाच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी पोस्टमार्टमच्या प्रक्रियेतही घोळ झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
Web Summary : CCTV footage reveals Twisha Sharma going to the roof before her death. Her husband and others are seen giving her CPR. The family alleges murder and drug abuse by the husband, demanding a new investigation.
Web Summary : सीसीटीवी फुटेज में ट्विशा शर्मा मौत से पहले छत की ओर जाती दिख रही हैं। पति और अन्य लोग उसे सीपीआर देते दिखे। परिवार ने हत्या और पति द्वारा नशीली दवाओं के सेवन का आरोप लगाया, नई जांच की मांग की।