भाजपाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर 'या' माजी मंत्र्याने पाठवला अश्लील व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 03:33 PM2020-06-24T15:33:22+5:302020-06-24T15:34:50+5:30

या घटनेनंतर कालू लाल गुर्जर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Former minister kalu lal gurjar has sent obscene video on BJP's WhatsApp group | भाजपाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर 'या' माजी मंत्र्याने पाठवला अश्लील व्हिडीओ

भाजपाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर 'या' माजी मंत्र्याने पाठवला अश्लील व्हिडीओ

Next
ठळक मुद्देराजस्थानात माजी मंत्री आणि मुख्य प्रतोद कालू लाल गुर्जर यांच्या मोबाईलवरून भाजपासह अन्य व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अश्लील व्हिडिओ पाठविल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.माजी मंत्री कालू लाल गुर्जर आमच्या' हम साथ साथ हैं 'या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपशी जोडलेले आहेत.

राजस्थानमध्येभाजपाचे ज्येष्ठ नेते कालू लाल गुर्जर यांच्या मोबाईलवरून भाजपासह अनेक इतर व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याची बाब समोर आली आहे. या घटनेनंतर कालू लाल गुर्जर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजस्थानात माजी मंत्री आणि मुख्य प्रतोद कालू लाल गुर्जर यांच्या मोबाईलवरून भाजपासह अन्य व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अश्लील व्हिडिओ पाठविल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. कालू लाल गुर्जर यांच्या मोबाईलवरून अनेक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अश्लील व्हिडिओ पाठविल्यामुळे भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याने गुर्जर यांच्याविरूद्ध मांडल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भाजपा किसान मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष कमलेश गुढ्ढा म्हणाले, 'माजी मंत्री कालू लाल गुर्जर आमच्या' हम साथ साथ हैं 'या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपशी जोडलेले आहेत. त्यांनी या ग्रुपमध्ये काही अश्लील व्हिडिओ पोस्ट केले. यामुळे आज मी त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

राजकीय षडयंत्र

त्याचवेळी भाजपाचे माजी मंत्री कालू लाल गुर्जर यांनी या प्रकरणाला राजकीय षडयंत्र म्हणून संबोधले. ते म्हणाले की, एका व्यक्तीने मला कॉल केला आणि मला सांगितले की, आपल्या नंबरवरून अश्लील व्हिडिओ ग्रुपवर पाठविला गेला आहे. मोबाईलवर पाहिले तेव्हा ते आढळले. हे माझ्या प्रतिमेला कलंकित करण्यासाठी केले गेलेले षडयंत्र आहे.


कालू लाल गुर्जर म्हणाले की, बरेच लोक मला भेटायला येतात आणि कदाचित त्यांच्यातील काहींनी हा व्हिडिओ माझ्या मोबाइलवरून व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पाठविला असावा, जेणेकरून माझी राजकीय प्रतिमा खराब होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या लोकांनी मला पराभूत केले होते, तेच लोक या षडयंत्रात सामील झाले असतील. कारण आगामी विधानसभा निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेमुळे मला तिकीट मिळेल याची त्यांना भीती वाटत आहे, असेही गुर्जर पुढे म्हणाले.

मात्र, आता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भीलवाड़ा येथील मांडल पोलिस अधिकारी राजेंद्र गोधारा यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणी कलम 67, 67 - ए आणि तंत्रज्ञान व माहिती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

बापरे! TikTok स्टार 'शेरा'च निघाला नैनाचा मारेकरी, पोलिसांनी सांगितलं हत्तेमागचं कारण

 

धक्कादायक! सलमान खुर्शीद 'या' राज्यात चालवत होता दहशतवादाची 'शाळा', एटीएसने केला मोठा खुलासा

 

Coronavirus News : कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा आरोप करून शेजाऱ्याने गार्डचे विटेने फोडलं डोकं

Web Title: Former minister kalu lal gurjar has sent obscene video on BJP's WhatsApp group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.