६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहार जेलमधून मुंबईत पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 04:18 PM2020-06-22T16:18:39+5:302020-06-22T16:20:59+5:30

शनिवारी विशेष कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर नवलखा यांनी मैत्रीण सहबा हुसेन व वकील यांना फोनवरून ही माहिती दिली.

Six rooms, 350 inmates and three toilets; Navlakha, who was sent from Tihar to Taloja Jail, revealed the incident | ६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहार जेलमधून मुंबईत पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहार जेलमधून मुंबईत पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

Next
ठळक मुद्देगेल्या महिन्यात दिल्लीतील तिहारमधून नवलखा यांना तुरूंगातून मुंबई येथे हलविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्याला शाळेत बांधलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे तळोजा मध्यवर्ती कारागृहात हलविण्यापूर्वी कैद्यांना क्वारंटाईन केले जात आहे.

एल्गार परिषद प्रकरणात अटक केलेले पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी त्यांचे वकील व कुटुंबातील सदस्यांना सांगितले की, खारघरमधील एका शाळेला तात्पुरती तुरूंग करण्यात आले आहे. तेथे कैद्यांना अतिशय वाईट स्थितीत ठेवले गेले आहे. शनिवारी विशेष कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर नवलखा यांनी मैत्रीण सहबा हुसेन व वकील यांना फोनवरून ही माहिती दिली. गेल्या महिन्यात दिल्लीतील तिहार जेलमधून नवलखा यांना मुंबईत येथे हलविण्यात आले होते.  मात्र, त्यानंतर त्यांना शाळेत बांधलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले आहे.


कोरोना साथीच्या आजारामुळे तळोजा मध्यवर्ती कारागृहात हलविण्यापूर्वी कैद्यांना क्वारंटाईन केले जात आहे. सहबा हुसेन यांनी सांगितले की, १५ दिवसानंतर नवलखाशी बोलले. ते म्हणाले की, ३५० कैद्यांना सहा खोल्यांमध्ये तीन शौचालये आणि सात युरिनल उपलब्ध आहेत. आंघोळीसाठी एकच स्नानगृह आहे. जिथे एक मग आणि बादली आहे. नवलखा ३५ कैद्यांसह एका खोलीत राहत आहेत.


सहबा म्हणाल्या की, कोरोनाच्या  भीतीमुळे काही कैदी शुद्ध हवा येत नसूनही संसर्ग होण्याच्या भीतीमुळे गॅलरीध्ये झोपले होते. पुढे त्या म्हणाल्या की, तिथल्या सद्यस्थितीबद्दल जाणून घेतल्यानंतर मी त्यांच्या तब्येतीबद्दल अतिशय चिंताग्रस्त आहे. त्यांच्यासारख्या कैद्याला ही अमानुष वागणूक दिली जात आहे. कैद्यांना बाह्य जगाविषयी कोणतीही माहिती दिली जात नाही. मी तुम्हाला सांगते की, गेल्या महिन्यात राज्य कारागृह विभागाने नवीन कैद्यांना तुरूंगात पाठवण्यापूर्वी त्यांना तातडीने तात्पुरत्या कारागृहात क्वारंटाईन ठेवण्याची मागणी केली होती. नवीन कैद्यांना २१ दिवस क्वारंटाईन ठेवण्याचा आणि स्क्रिनिंगचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मध्यवर्ती कारागृहात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु २१ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही खारघर शाळेतील कैद्यांना मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले नाही.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

Web Title: Six rooms, 350 inmates and three toilets; Navlakha, who was sent from Tihar to Taloja Jail, revealed the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.