पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:50 PM2020-06-18T14:50:35+5:302020-06-18T14:57:24+5:30

पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. ही घटना १८ दिवसांपूर्वी घडली आहे.

A shameful incident took place when he cheated on his wife and took her to a secluded place | पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

Next
ठळक मुद्दे परिसरातील एक ३५ वर्षीय विवाहित महिला ४ जून रोजी हरियाणा येथे राहणाऱ्या आपल्या वडिलांसोबत पोलीस ठाण्यात आली होती आणि त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. घटनेदरम्यान तिचा नवरा खोलीच्या बाहेर काठ्या घेऊन गस्त घालत होता.

अलवर जिल्ह्यातील शाहजहांपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक लज्जास्पद घटना घडली आहे. लग्नाच्या वेळी, सात घेरे घेऊन बायकोच्या जीवाचे रक्षण करण्याचे वचन देणाऱ्या पतीने त्याच्या मित्राला त्याच्या पत्नीवर बलात्कार करण्यास मदत केली. बलात्काराच्या घटनेवेळी तो पहारा देत राहिला. पती-पत्नीच्या नात्याला लाज आणणारी ही घटना ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. ही घटना १८ दिवसांपूर्वी घडली आहे.

शाहजहांपूरचे पोलीस अधिकारी सुरेंद्रसिंह रावत यांनी सांगितले की, परिसरातील एक ३५ वर्षीय विवाहित महिला ४ जून रोजी हरियाणा येथे राहणाऱ्या आपल्या वडिलांसोबत पोलीस ठाण्यात आली होती आणि त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. पीडित महिलेने सांगितले की, तिच्या नवऱ्याने तिला ३१ मे रोजी शाहजहांपूर बाजारात घेऊन जाण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून घेऊन गेला. जाताना पतीने त्याचा मित्र मिचू उर्फ बलवंत धानक यांनाही दुचाकीवर घेऊन गेला.

जीवे मारण्याची धमकी दिली

वाटेत एका निर्जन ठिकाणी निवारा शेडनजीक दुचाकी थांबवण्यात आल्याचा आरोप या महिलेचा आहे. यानंतर तिघे तेथे थोडावेळ बसले. तेवढ्यातच मिचू ऊर्फ बलवंत धानक याने तिला निवारा शेडमध्ये बांधलेल्या खोलीत जबरदस्तीने नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घटनेदरम्यान तिचा नवरा खोलीच्या बाहेर काठ्या घेऊन गस्त घालत होता. पीडितेचा आरोप आहे की, तिच्या नवऱ्यानेच हा लाजिरवाणा कट रचला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर घटनेविषयी कोणालाही सांगून नको अन्यथा जिवे मारू अशी धमकी दिली. घटनेच्या तीन-चार दिवसांनी पीडित मुलीने तिच्या माहेरी जाऊन आपल्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर वडील आणि मुलीने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदविला.


दोन्ही आरोपींना अटक

या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पीडितेच्या नवऱ्यासह त्याचं साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नीमराणाचे डीएसपी लोकेश मीणा तपास करीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

 

बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध

 

Web Title: A shameful incident took place when he cheated on his wife and took her to a secluded place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.