तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 11:22 PM2020-06-20T23:22:39+5:302020-06-20T23:26:47+5:30

ट्रम्प प्रशासन भारताला मोठे सहकार्य करत असून राणाच्या प्रत्यार्पणाची आवश्यक कागदोपत्री तयारी केली जात आहे. राणाची शिक्षा 2021 मध्ये संपणार होती. मात्र, त्याला त्या आधीच सोडून देण्यात आले होते. 

Extradition of Tahawwur Rana reveals ISI's covert operations - special Public Prosecutor Ujjwal Nikam | तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

Next
ठळक मुद्देतहव्वूर राणा यांच्या प्रत्यर्पणानंतर ISIच्या कारवायांविषयी अधिक माहिती मिळेल. शनिवारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली. १० जूनला राणाला पुन्हा लॉस एंजेलिसमध्ये अटक करण्यात आली होती. भारताच्या विनंतीनुसार राणाला फरार घोषित करण्यात आले.

नवी दिल्ली - पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन व्यावसायिक तहव्वूर राणा यांच्या प्रत्यर्पणानंतर ISIच्या कारवायांविषयी अधिक माहिती मिळेल. शनिवारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली. मुंबईत झालेल्या २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्यात सामील झाल्याबद्दल तहव्वूरला अटक करण्यात आली आहे.

१० जूनला राणाला पुन्हा लॉस एंजेलिसमध्ये अटक करण्यात आली होती. भारताच्या विनंतीनुसार राणाला फरार घोषित करण्यात आले. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले, राणा याच्यावर भारतात दहशतवादी कारवाया करण्याच्या एका मोठ्या गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. निकम म्हणाले, "पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीने व्हिडीओ लिंकद्वारे कोर्टासमोर केलेल्या जबानीत कबूल केले की राणा याला २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या कटाची पूर्ण माहिती होती." ते पुढे म्हणाले की, हेडलीनेही कबूल केले होते की, राणा त्याला पैसे देत असे. निकम यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर हेडलीने लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या कार्यात त्याचा सहभाग आणि आयएसआयशी असलेले संबंध याबद्दल 'संवेदनशील खुलासे' केले.

 

२६/११दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला अमेरिकेमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला भारतात पाठविण्याची मोठी शक्यता आहे. राणा हा पाकिस्तानी-कॅनडाचा नागरिक असून त्याला अमेरिकेने २६'११ हल्ल्यामध्ये सहभागी असल्याने शिक्षाही केली होती.तहव्वूर राणाला अमेरिकेच्या लॉस अँजेलिस शहरातून अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच राणाला तुरुंगातून सोडण्यात आले होते. मात्र, अमेरिकेच्या प्रशासनाने त्याला पुन्हा अटक केली आहे. सांगितले जात आहे की, ट्रम्प प्रशासन भारताला मोठे सहकार्य करत असून राणाच्या प्रत्यार्पणाची आवश्यक कागदोपत्री तयारी केली जात आहे. राणाची शिक्षा 2021 मध्ये संपणार होती. मात्र, त्याला त्या आधीच सोडून देण्यात आले होते. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण 

 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहादसाठी भडकवत होता लोकांना, युपी एटीएसने केली अटक

 

बेपत्ता ७० वर्षाच्या वृध्दाचा मृतदेह आढळला, लोखंडी तारेने गळा आवळून हत्या 

 

प्रेयसीला सोबत घेऊन कॅशियरनेच लावला बँकेला चूना; 'इतकं' किलो सोनं लंपास

 

Sushant Singh Rajput : सुशांत सोबतच्या कॉन्ट्रॅक्टची प्रत यशराज फिल्मने पोलिसांकडे सोपवली

Web Title: Extradition of Tahawwur Rana reveals ISI's covert operations - special Public Prosecutor Ujjwal Nikam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.