धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 02:06 PM2020-06-22T14:06:27+5:302020-06-22T14:09:43+5:30

या प्रकरणाची अमरेली जिल्हा पोलीस चौकशी करत आहेत.

Shocking incident! A woman was raped 7 times by 3 monk in the temple | धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपी साधूंनी ७ वेळा बलात्कार केल्याचे दुष्कृत्य केल्याचे या पीडित महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. पोलीस सध्या या साधूंनी आणखी इतर महिलांवर अशा प्रकारे लैंगिक अत्याचार केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

राजकोट  -  गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील तीन साधूंनी एका ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. आरोपी साधूंनी ७ वेळा बलात्कार केल्याचे या पीडित महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर या तिन्ही साधूंना अमरेली पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणाची दम नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर या साधूंना बेड्या ठोकण्यात आल्या.

या महिलेने मजुरीच्या नावाखाली साधूंनी गेले १८ महिने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या महिलेची वैद्यकीय तपासणी केली असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. पोलीस सध्या या साधूंनी आणखी इतर महिलांवर अशा प्रकारे लैंगिक अत्याचार केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. रघुराम भंगार, जगदीश भागात आणि भावेश भागात अशा अटक केलेल्या साधूंची नावे आहेत. 



राजस्थानमध्ये घडली होती अशी घटना, उघड झालेली धक्कादायक माहिती 
त्याचप्रमाणे, अलीकडे राजस्थानच्या करौली जिल्ह्यात एका गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याच्या घटनेत एका जैन साधूला अटक करण्यात आली होती.या साधूकडून पोलिसांनी कंडोम पॅकेट्स, ३३ पेन ड्राईव्ह आणि दोन लॅपटॉप हस्तगत केले आहेत. हस्तगत केलेल्या वस्तू पोलिसांना आरोपी राहत असलेल्या आश्रय निवासात एका मोठ्या बॅगमध्ये सापडल्या. या बॅगमध्ये तब्बल १९ मोबाइल फोन, २ लॅपटॉप, ४ हार्ड डिस्क, कंडोम पॅकेट्स आणि ३३ पेन ड्राईव्ह होत्या. दरम्यान, पोलिसांनी मिळालेली हार्ड डिस्क स्कॅन केल्यानंतर यात त्यांना अश्लील व्हिडीओ आढळून आले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाने ISI च्या छुप्या कारवायांची माहिती मिळेल : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

Read in English

Web Title: Shocking incident! A woman was raped 7 times by 3 monk in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.