Coronavirus News : कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा आरोप करून शेजाऱ्याने गार्डचे विटेने फोडलं डोकं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 01:43 PM2020-06-24T13:43:02+5:302020-06-24T13:45:31+5:30

Coronavirus : विटेने केलेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा रक्षक विजय कुमार यांच्या डोक्याला अनेक टाके डॉक्टरांना घालावे लागले. आता त्यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

Coronavirus News: Neighbors beat guard's head with bricks, accusing him of spreading coronavirus infection | Coronavirus News : कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा आरोप करून शेजाऱ्याने गार्डचे विटेने फोडलं डोकं

Coronavirus News : कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा आरोप करून शेजाऱ्याने गार्डचे विटेने फोडलं डोकं

Next
ठळक मुद्देविजय कुमार आपल्या कुटुंबासमवेत हर्ष विहारच्या बी-ब्लॉकमध्ये राहतो आणि गेल्या तीन वर्षांपासून जीटीबी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. या हल्ल्यात सुरक्षारक्षकाच्या डोक्याला जखम झाली. मात्र, आता त्यांची प्रकृती ठीक असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या जीटीबी रूग्णालयात सुरक्षा रक्षक (गार्ड) म्हणून काम करणारे विजय कुमार यांच्यावर त्याच्या शेजाऱ्याने विटांनी हल्ला करून जखमी केले आहे. मंगळवारी पोलिसांनी सांगितले की, उत्तर - पूर्व दिल्लीतील हर्ष विहार येथे राहणार्‍या जीटीबी रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला त्याच्या शेजारी राहणाऱ्या विकासने कोरोना व्हायरस फैलाव करण्याच्या मुद्द्यावरून मारहाण केली. त्याचवेळी त्याने सुरक्षा रक्षकाला दगडाने मारहाण करून जखमी केले. 


विटेने केलेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा रक्षक विजय कुमार यांच्या डोक्याला अनेक टाके डॉक्टरांना घालावे लागले. आता त्यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त (उत्तर-पूर्व) वेदप्रकाश सूर्य यांनी सांगितले की, २४ वर्षीय संशयित विकास याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरूद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. विजय कुमार आपल्या कुटुंबासमवेत हर्ष विहारच्या बी-ब्लॉकमध्ये राहतो आणि गेल्या तीन वर्षांपासून जीटीबी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या या रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येतात. 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी विजय कुमार आपल्या गच्चीवर व्यायाम करत असताना हा हल्ला करण्यात आला. त्याच्या गच्चीचा भाग शेजारी राहणाऱ्या विकासच्या घराशी जोडलेला आहे. विकास कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, विकासने त्याला कोठे काम करता असे विचारले. कुमार म्हणाले, मी जीटीबी हॉस्पिटलमध्ये गार्ड म्हणून काम करतो हे सांगितल्यावर आरोपी विकासने सांगितले की,  तुम्ही 'कोरोना हॉस्पिटल'मध्ये काम करता तर तुम्ही हा विषाणू आजूबाजूला पसरवाल. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले आणि हे प्रकरण इतके वाढले की, विकासने त्याच्या काही मित्रांसह सुरक्षारक्षकाच्या घरात प्रवेश केला आणि मारहाण केली. त्याचवेळी त्याने विजय कुमारच्या डोक्यावर वीट घातली. या हल्ल्यात सुरक्षारक्षकाच्या डोक्याला जखम झाली. मात्र, आता त्यांची प्रकृती ठीक असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

बापरे! TikTok स्टार 'शेरा'च निघाला नैनाचा मारेकरी, पोलिसांनी सांगितलं हत्तेमागचं कारण

 

धक्कादायक! सलमान खुर्शीद 'या' राज्यात चालवत होता दहशतवादाची 'शाळा', एटीएसने केला मोठा खुलासा

Web Title: Coronavirus News: Neighbors beat guard's head with bricks, accusing him of spreading coronavirus infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.