छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षाचे नारेगाव प्रभाग क्र. ९ मधील नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खानला आपल्या घरात आश्रय दिल्याप्रकरणी पोलिसांनी यापक्ररणी त्यांच्यावर गुन्हा नोंद केला. यात महापालिकेने पटेल यांच्या मालमत्तांची चौकशी सुरू केली असून आतापर्यंत तीन मालमत्तांना अनधिकृत बांधकाम केल्यासंदर्भात नोटिसा चिटकवण्यात आला आहे. सोमवारी त्यांच्याकडून मालकी हक्काची कोणतीही कागदपत्रे मनपाला सादर करण्यात आली नाहीत. मनपाने मालमत्ता कोणाच्या नावावर आहेत, याची शहानिशा सुरू केली. नोटिसांची मुदत मंगळवारी संपणार असून त्यानंतर पुढील कारवाई होईल.
महापालिका निवडणुकीत मतीन पटेल यांनी उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र सादर केले. त्यामध्ये त्यांनी पत्ता प्लॉट क्रमांक २, गट क्रमांक ५ दर्गा मशीदजवळ, बिसमिल्ला कॉलनी, नारेगाव असा उल्लेख केला आहे. हे घर नेमके कोणाच्या नावावर आहे, याचा उलगडा झालेला नाही. याशिवाय निदा खानला ज्या घरात लपविले होते, ते घर कोणाच्या मालकीचे आहे, हाही मुद्दा आहे. मनपाच्या सूत्रांनी सांगितले की, घरावर ताबा पटेल यांचा आहे. मात्र अधिकृतपणे बॉन्ड पेपरवर व्यवहार झाला नाही. ज्या ठिकाणी कार्यालय आहे, ती जागा कोणाच्या मालकीची आहे, हे सुद्धा शोधण्यात येत आहे. मतीन पटेल यांनी तिन्ही नोटिसांचे उत्तर मनपाला दिलेले नाही. त्यामुळे या मालमत्ता अनधिकृत आहेत, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने बांधला आहे. इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या पटेल यांनी शपथपत्रात मालमत्तांचा उल्लेख केलेला नाही.
प्रशासन आपले काम करेल
एखाद्या लोकप्रतिनिधीचे शहरात अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास त्याच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. मतीन पटेल प्रकरणात प्रशासन आपली कारवाई करीत आहे. काय खरे, काय खोटे; हे प्रशासन बघेल. कायद्याच्या चौकटीत प्रशासनाने नोटीस दिली. उत्तर न आल्यास पुढील कारवाई होईल.
समीर राजूरकर, महापौर
एमआयएम नगरसेवकाचे दुसरे प्रकरण
एमआयएमचे प्रभाग क्रमांक ६ मधील नगरसेवक मेराज खान हे इस्लाम पक्षाचे रफत यारखान यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी फरार होते. अलीकडेच त्यांना जामीन मिळाला. हे प्रकरण शांत होत नाही, तोच एमआयएमच्या मतीन पटेल यांचा गंभीर मुद्दा समोर आला.
Web Summary : MIM corporator Matin Patel, who sheltered Nida Khan, faces property investigation. Notices were issued for unauthorized constructions, but Patel failed to provide ownership documents. The municipality is verifying property ownership and will proceed with further action after the notice deadline.
Web Summary : निदा खान को आश्रय देने वाले MIM पार्षद मतीन पटेल की संपत्तियों की जांच शुरू हो गई है। अनधिकृत निर्माण के लिए नोटिस जारी किए गए, लेकिन पटेल स्वामित्व दस्तावेज प्रदान करने में विफल रहे। नगरपालिका संपत्ति के स्वामित्व का सत्यापन कर रही है और नोटिस की समय सीमा के बाद आगे की कार्रवाई करेगी।