शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही पोलीस आहोत, दागिने पिशवीत ठेवा!"; भररस्त्यात हातचलाखीने वृद्धेचे ९ तोळे सोनं लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 12:55 IST

हातचलाखीने लुटले ९ तोळे सोने; चोरट्यांनी चक्क हातावर 'खोबरेल तेल' टाकून काढल्या सोन्याच्या पाटल्या

छत्रपती संभाजीनगर : मंदिरातून घराकडे निघालेल्या वृद्ध महिलेला पोलिस असल्याची बतावणी करीत, ओळखपत्र दाखवून या परिसरात चोऱ्या होत आहेत. तुमच्या अंगावरील साेन्याचे दागिने पिशवीत ठेवा, असे सांगितले. पोलिस असल्याचे सांगितल्यामुळे वृध्देचा विश्वास बसल्यानंतर ९ तोळे वजनाच्या हातातील बागड्या, गळ्यातील दागिने, बोटातील अंगठ्या काढून पिशवीत ठेवल्या. त्यानंतर भामट्यांनी हातचलाखी करीत पिशवीत दुसऱ्याच व्यक्तीचे कडे ठेवून दागिने लंपास केले. हा प्रकार छत्रपती कॉलेजसमोर सोमवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदवला. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत.

श्रीकंवरबाई इंदरचंदजी लुंकड (६७, रा. स्वामी विवेकानंदनगर, गारखेडा परिसर) यांच्या फिर्यादीनुसार त्या दररोज घरातूून सकाळी साडेनऊला जैन मंदिर, एन- ३, गारखेडा परिसराकडे जातात. मंदिरातून दररोज पायी चालत येतात. सोमवारी सकाळी साडेदहाला त्या मंदिरातून घरी जाण्यासाठी निघाल्या. छत्रपती कॉलेजसमोरील रस्त्यावर असताना समोरून दोन व्यक्ती एका दुचाकीवर आले. त्यांनी खिशातील आयकार्ड दाखवून आम्ही पोलिस आहोत. या परिसरात सतत चोऱ्या होत आहेत. त्यामुळे तुमच्याजवळील दागिने हातातील पिशवीत काढून ठेवा, असे सागितले. त्याचवेळी दुचाकीवर दुसरा एक व्यक्ती आला. त्यानेही हातातील पिवळे कडे काढायचे असल्याचे सांगून तो काढू लागला. फिर्यादीने हातातील ६ तोळ्याच्या पाटल्या, गळ्यातील दोन तोळे वजनाची कंठी आणि बोटातील प्रत्येकी ४ ग्रॅमच्या दोन अंगठ्या काढून पिशवीत ठेवल्या. त्यानंतर दुचाकीवरील भामट्यांनी त्या बाहेर काढून स्वत:कडील पिशवीत ठेवतो, असे सांगून, फिर्यादीच्या हातातील पिशवी घेऊन त्यातील दागिने दुसऱ्या पिशवीत ठेवून पिशवीला तीन गाठी मारल्या. तेव्हा फिर्यादीने सोने दाखविण्याची मागणी केली असता त्यांनी हातात पिशवी देऊन उघडून बघत बसा, असे म्हणून पोबारा केला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे करीत आहेत.

पाटल्या निघत नव्हत्या म्हणून खोबरेल तेल दिले
पोलिस असल्याची बतावणी करणाऱ्या भामट्यांना फिर्यादीने हातातील पाटल्या निघत नसल्याचे सांगितले. तेव्हा भामट्यांनी फिर्यादीच्या हातावर खोबरेल तेलाची बॉटल काढून त्यातील थेंब हातावर टाकले. त्यानंतर हातातील पाटल्या निघाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake cops rob elderly woman of gold in broad daylight.

Web Summary : Posing as police, thieves stole nine tolas of gold from an elderly woman near a college. They tricked her into placing her jewelry in a bag, then swapped it before fleeing. Police are investigating, with CCTV footage aiding the search.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर