वणी शहरात गेल्या एक महिन्यांपासून डेंग्यसदृश्य आजाराचे अक्षरश: थैमान सुरू आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात या आजाराने बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ...
वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात अॅन्युअल कॉन्फरन्स आॅफ विदर्भ सर्जन असोसिएशनची परिषद आयोजित करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या परिषदेत देशपातळीवरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून मार्गदर्शन केले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘जबाब दो’ पदयात्रेचे तरोडा, मंगरूळ येथे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्त्वात सोमवारी आर्णी येथून पदयात्रेला सुरुवात झाली. ...
गेल्या चार वर्षांपासून जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारने गोरगरीब जनतेवर अवघ्या एक किलो साखरेत दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना दिवाळीच्या निमित्ताने प्रती कार्ड केवळ एक किलो साखर दिली ज ...
जिल्ह्यातील रेतीघाटांची मुदत सप्टेंबरमध्ये संपली. त्यानंतर नव्याने रेतीघाटांचा लिलाव झाला. त्यालाही न्यायालयातून स्थगिती मिळाली आहे. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत रेतीघाटांची सुरक्षा करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेवर आहे. ...
अनुदानाच्या मागणीसाठी जवळपास दरवर्षी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक परीक्षेवर बहिष्काराची भाषा करतात. मात्र, यंदा विभागातील चक्क ‘फुल्ल पगारी’ शिक्षकांनीच अघोषित बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. ...
उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८संचालकासाठी झालेल्या निवडणूकीचा निकाल आज सायंकाळी जाहीर झाला . या निवडणुकीत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन पॅनलने १८ पैकी १o जागा जिंकून वर्चस्व प्रस्तापित केले. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. सोमवारी मतमोजणीनंतर १८ पैकी १० जागांवर काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले. शिवसेना-भाजपा युतीने सात जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला. ...
नगरपरिषदेच्या गाळ्यांचे नुतनीकरण बेकायदेशीररित्या झाले आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, असा प्रस्ताव खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला आहे. मात्र मंत्रालयस्तरावर गेली १५ महिन्यांपासून हा प्रस्ताव मार्गी लागण्याच्या प्रतीक्षेत आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना आयईटीईचा इनोव्हेशन मीट पुरस्कार प्राप्त झाला आहे. यात संगणक अभियांत्रिकी विभागाची दिव्या सोढा व परमाणु व दूरसंचार विभागाचा प्रसाद नीलजकर यांचा समावेश आहे. ...