शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील विविध भागात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना वणी शहरात मात्र अतिक्रमण हटावबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाही. ...
दिवंगत वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेतून शहरात दरवर्षी १ जानेवारीला कुस्त्यांची दंगल भरविली जाते. यावर्षी अंतिम लढतीत हिंगोलीचा पहेलवान गजानन भोयर याने सुनील शेवतकर याला लोळवून अजिंक्यपद प्राप्त करून चांदीची गदा पटकाविली. ...
तालुक्यातील पाथ्रड गोळे येथील स्वस्त धान्य दुकानाची थेट उच्च न्यायालयाच्या आदेशावरून चौकशी केली जात आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी स्वत: गावात जावून ग्रामस्थांचे बयाण घेत आहे. ...
तालुक्यातील पांढरी येथे विनयभंगाच्या वादातून युवकावर दोघांनी चाकू हल्ला केला. या युवकाचा उपचारादरम्यान गुरुवारी यवतमाळात मृत्यू झाला. त्यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी चाकूहल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी मृतदेह घेऊन दुपारी नेर ठाण्यासमोर ...
एकीकडे रेती घाटांचा लिलाव न झाल्याने रेतीअभावी बांधकामे प्रभावित झाली असताना दुसरीकडे घुग्घूस (जि.चंद्रपूर) येथील वाळू तस्कर मोठ्या प्रमाणावर वणीत रेतीचा अवैधरित्या पुरवठा करित असल्याची बाब समोर आली आहे. ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध घरकूल योजनांच्या लाभार्थ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधला. ‘लोकसंवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय जमीन ...
वनपरिक्षेत्रामध्ये सातत्याने सागवान वृक्षांची कत्तल सुरू आहे. म्हसोला फाट्यावर मातीच्या ढिगाऱ्यातून सागवान लाकडाचा बेवारस साठा बाहेर आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवान कटाई होऊन वनविभागाची स्थानिक यंत्रणा कोणतीच कारवाई करण्यास तयार नाही. ...
दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या राज्यातील गावांना पाणीदार करण्याची ही नामी संधी आहे. दुष्काळाला संकट न समजता संधी समजून त्याचा मुकाबला करण्याबाबत जनाजगृती करण्यासाठी अंकितने उभ्या महाराष्ट्राची सायकलस्वारी सुरू केली आहे. ...