Next

देशभरातील 'एवढे' बँक घोटाळे महाराष्ट्रात | Bank Scams in Maharashtra | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 01:43 PM2021-09-29T13:43:42+5:302021-09-29T13:44:09+5:30

महाराष्ट्रात सहकाराचं जाळं मोठ्या प्रमाणावर पसरलंय.. कारखाने, शिक्षण संस्था, पतसंस्था, बँका.. अशा अनेक ठिकाणी सहकाराच्या माध्यमातून कारभार चालतो. ज्या महाराष्ट्रात सहकाराची गंगोत्री वाहिली. गोरगरीब आणि ग्रामीण जनतेच्या आयुष्यात सुबत्ता पेरली, त्याच महाराष्ट्राची सहकार गंगेला घोटाळ्यांची गळती लागलीय. याच सहकारात अनेक गैरव्यवहारांचे प्रकार देखील घडलेत. एका आकडेवारीनुसार धक्कादायक माहिती समोर आलीय. नागरी सहकारी बँकांतील घोटाळ्यात महाराष्ट्र गेल्या तीन वर्षांपासून अव्वल असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून समोर आलंय.