गेल्या दहा दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या बोचऱ्या गार वाऱ्याचा व त्याने वाढत जाणाऱ्या थंडीचा कडाका सहन करणाऱ्या नागपूरकरांना अजून एका थंडगार रात्रीचा सामना करावा लागला. ...
गत आठवड्यात किमान व कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली होती. दरम्यान, बुधवारी पुन्हा किमान तापमानात घट होऊन 5.5 अंश सेल्सिअस अशी नोंद येथील हवामान केंद्रावर झाली आहे़ ...
भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. ...