सद्यस्थितीत आयुष्य फारच गतीमान झाले आहे. प्रत्येकजण काहीना काही मिळविण्यासाठी धाव-धावतोय. कोणी, नोकरी, करिअर, कुटुंब, स्वप्न, पैसा, प्रतिष्ठा मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहे. ...
ज्या पूर्वजांनी अपार कष्ट सोसून आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, कष्ट सोसून सर्व सुख उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या ऋणातून तर आपण उतराई होऊ शकत नाहीत. ...
भूलोकांपासून स्वर्गात पोहोचण्यास लागणारा काल तीन पिढ्या म्हणजेच साधारणत: साठ ते शंभर वर्षांचा काल गृहीत धरलेला आहे. त्यानंतर मृताला स्वर्ग किंवा कर्मानुरूप गती प्राप्त होते. ...
मनुष्यवस्तीच्या वाढत्या कोलाहलात काकराजाचा शोध घेताना पितरांचे स्मरण होत असले तरी, संबंधितांच्या जीवितावस्थेत आपण कोणती कर्तव्यपूर्ती केली याचे आत्मपरीक्षण घडून येते का, हा प्रश्नच ठरावा. ...
विदेशांतही पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी काही ना काही केले जाते. आपल्याकडे त्याला श्राद्ध, पितृपक्ष असे म्हटले जात असले तरी तिकडे त्याला वेगळे नाव असते. ...