Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 06:54 IST2026-04-25T06:52:02+5:302026-04-25T06:54:22+5:30

Pratap Sarnaik: राज्यातील रिक्षा-टॅक्सीसह सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनचालकांना मराठी भाषा शिकावीच लागेल. मी मराठी शिकणार नाही, अशी मुजोरी त्यांनी केल्यास ती सहन केली जाणार नाही, त्या वाहनचालकाचा परवाना रद्द केला जाईल, अशा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.

Transport Minister Pratap Sarnaik Issues Stern Warning to Drivers; BJP Calls for More Time Amid Growing Political Row | Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

उमाकांत देशपांडे 
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: राज्यातील रिक्षा-टॅक्सीसह सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनचालकांना मराठी भाषा शिकावीच लागेल. मी मराठी शिकणार नाही, अशी मुजोरी त्यांनी केल्यास ती सहन केली जाणार नाही, त्या वाहनचालकाचा परवाना रद्द केला जाईल, असा खणखणीत इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर या वाहनचालकांना मराठीतून बोलावे लागेल, असे सरनाईक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मात्र, सरनाईक यांच्या निर्णयास शिंदेसेनेतही मतमतांतरे असून भाजपनेही एकदम सक्ती लादू नये, अशी भूमिका घेतली आहे. मराठी शिकण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचालकांना वेळ दिला पाहिजे, असे मत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी व्यक्त केले. 

रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बोलता येत नसल्यास एक मेपासून मोहीम राबवून त्यांचे वाहन परवाने रद्द करण्याची घोषणा सरनाईक यांनी केली. रिक्षा-टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव व अन्य काही संघटनांनी सरनाईक यांच्या निर्णयास विरोध केला आहे. शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी मराठी सक्तीला विरोध केला आहे, तर प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी पाठिंबा दिला. सरनाईक यांच्या निर्णयाचे राजकीय पडसाद निर्माण झाले असून रिक्षा-टॅक्सी चालकांत अस्वस्थता आहे. मराठी विरुद्ध अमराठी असे वातावरण महामुंबईत तापू लागले आहे. मनसेनेही मराठी सक्तीची भूमिका घेतली असून मराठी रिक्षा-टॅक्सींच्या मागे ‘मला मराठी येते’ अशा आशयाचे स्टीकर लावण्यात येत आहेत.

मराठी शिकण्यासाठी काही महिन्यांचा वेळ 

- मराठी येत नसल्यास परवाने रद्दच्या निर्णयास विरोध होऊ लागल्यानंतर  रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकविण्यासाठी काही संस्थांनी व परिवहन विभागानेही पुढाकार घेतला आहे व नुकतीच एक बैठकही झाली. त्यामुळे मराठी शिकण्यासाठी काही महिन्यांचा वेळ दिला जाणार आहे का, सरनाईक यांनी भाजप किंवा काही नेत्यांच्या विरोधामुळे आपली भूमिका मवाळ केली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

- या पार्श्वभूमीवर सरनाईक यांना विचारता भाजप किंवा अन्य  सत्ताधारी पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी माझ्या निर्णयावर ठाम असून ज्या रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ हवा असेल, तर यासंदर्भात २८ किंवा २९ तारखेला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, पण आम्ही मराठी शिकणारच नाही, अशी कोणाची भूमिका असेल, तर ती सहन करणार नाही, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

सक्ती नको, मराठी शिकण्यास वेळ द्यावा : अमित साटम 

रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी आलेच पाहिजे. मराठी ही राज्याची राजभाषा आहे, ती सर्वांनी प्रेमाने शिकली पाहिजे. मात्र, परिवहन विभागानेही एकदम सक्ती न करता रिक्षा-टँक्सीवाल्यांना ती शिकण्यासाठी काही महिन्यांचा वेळ दिला पाहिजे. त्यांच्यासाठी मराठी बोलण्याचे कमी कालावधीचे प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात यावेत, असे मत अमित साटम यांनी व्यक्त केले.

Web Title : मराठी अनिवार्यता: अवज्ञा करने वाले चालकों का लाइसेंस रद्द, मंत्री सरनाईक की चेतावनी

Web Summary : महाराष्ट्र में चालकों के लिए मराठी अनिवार्य; इनकार पर लाइसेंस रद्द, मंत्री सरनाईक की चेतावनी। बीजेपी ने सीखने के लिए समय देने का सुझाव दिया।

Web Title : Marathi Compulsion: License Cancellation for Defiant Drivers, Warns Minister Sarnaik

Web Summary : Maharashtra mandates Marathi for drivers; refusal leads to license cancellation, warns Minister Sarnaik. BJP suggests time for learning.