माजी विजेत्या अर्जेंटिनाला १-१ असे बरोबरीत रोखून इवल्याशा आईसलँडने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत दणक्यात पदार्पण साजरे केले. ‘ड’ गटाच्या या सामन्यात आईसलँडच्या विजयाचे शिल्पकार त्यांचा गोलरक्षक हॅनेस हॅलडोर्सन व २३ व्या मिनिटाला गोल करणारा आल्फ्रेड फिनबॉस ...
एकमेकांविरुद्ध खेळणे नको, असे कदाचित पोर्तुगाल व स्पेन या दोन्ही संघांचे चाहते म्हणत असतील. पण विश्वचषकात दोघेही ‘ब’ या एकाच गटात आले. एवढेच नाही तर स्पर्धेची सुरुवातही दोघांना एकमेकांना भेदून करायची आहे. ...
इजिप्तविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उरुग्वेचा संघ पहिल्यापासून आक्रमक असेल, असे वाटत होते. पण उरुग्वेचा स्टार फुटबॉलपटू लुईस सुआरेझने मात्र साफ निराश केले. ...