भाजपसाठी शिल्लक राहिलेला एकमेव गुहागर मतदारसंघही आता विद्यमान आमदार म्हणून सेनेच्या गळ्यात पडण्याची शक्यता असल्याने भाजपला जिल्ह्यात उमेदवारीसाठी विधानसभा मतदारसंघच शिल्लक राहणार नाही. ...
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४ हजार ४२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे भात खाचरे पाण्याने तुडुंब भरली आहेत. हळवे बियाणे प्रसवण्यावेळीच पावसाचा जोर सर्वाधिक असल्याने जिल्ह्यातील ४० टक्के भातपीक धोक्यात आले आहे. ...
संगमेश्वर तालुक्यातील कडवई किंजळकर वाडी येथे महेश किंजळकर यांच्या घराशेजारी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यात एकही लोकनियुक्त प्रतिनिधी नसला तरीही काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजूनही कायम आहे. या गटबाजीतून रमेश कदम यांना जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू देत अॅड. विजय भोसले यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झाल ...
रत्नागिरी तालुक्यातील जयगड गावातील विकास वामन परकर यांच्या घरासमोरील अंगणवजा सभागृहात वागळे पीर बाबांची कबर आहे. परकर कुटुंबीय गणेशोत्सव उत्साहाने साजरा करतात. सध्या त्यांच्या घरात गणपत्तीबाप्पा विराजमान झाला आहे, त्यामुळे सर्वधर्मसमभावनेचा हा अनोखा ...
चिपळूण तालुक्यातील तिवरे येथे झालेल्या धरणफुटी दुर्घटनेला दोन महिने पूर्ण झाले. या दुर्घटनेची एसआयटी मार्फत चौकशी सुरू झाली होती. दोन महिन्यामध्ये चौकशीचा अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले होते; मात्र अद्यापही या अहवालातील माहिती प्रसिद्ध न झाल्याने ...