गटबाजीत बुडालेल्या रत्नागिरी काँग्रेसला नवसंजीवनी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:09 PM2019-09-09T12:09:56+5:302019-09-09T12:10:33+5:30

रत्नागिरी जिल्ह्यात एकही लोकनियुक्त प्रतिनिधी नसला तरीही काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजूनही कायम आहे. या गटबाजीतून रमेश कदम यांना जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू देत अ‍ॅड. विजय भोसले यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या बदलातून नवसंजीवनीची अपेक्षा काँग्रेसचे पदाधिकारी करत आहेत.

Navsanjivani to the Ratnagiri Congress, devoted to gangs? | गटबाजीत बुडालेल्या रत्नागिरी काँग्रेसला नवसंजीवनी?

गटबाजीत बुडालेल्या रत्नागिरी काँग्रेसला नवसंजीवनी?

Next
ठळक मुद्देगटबाजीत बुडालेल्या रत्नागिरी काँग्रेसला नवसंजीवनी?सर्वच तालुक्यांना आली आहे मरगळ

रत्नागिरी : जिल्ह्यात एकही लोकनियुक्त प्रतिनिधी नसला तरीही काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण अजूनही कायम आहे. या गटबाजीतून रमेश कदम यांना जिल्हाध्यक्ष पदावरून डच्चू देत अ‍ॅड. विजय भोसले यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या बदलातून नवसंजीवनीची अपेक्षा काँग्रेसचे पदाधिकारी करत आहेत.

चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवून काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीआधी जिल्हाध्यक्ष पदावर बसवले. मूळचे काँग्रेसवासी असलेले कदम हे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसपासून दुरावले. २००४ ते २००९ याकाळात ते चिपळूणचे आमदार होते. त्यानंतरच्या काळात भास्कर जाधव यांच्याशी असलेल्या वादामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. त्यात मोठा पुढाकार खासदार हुसेन दलवाई यांचा होता.

रमेश कदम यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या काळात पक्षासाठी काहीच ठोस केले नाही, हा आक्षेप त्यांच्यावर घेतला गेला. त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या काळात अनेक तालुक्यांमध्ये पक्षाची बैठकच झाली नाही. त्याशिवायच जिल्हा कार्यकारिणी तयार केली गेली. त्यामुळे एका गटाने त्याला जोरदार आक्षेप घेतला. तेथून त्यांच्या विरोधातील वातावरण वाढले.

रमेश कदम यांना पक्षात घेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांनीच नंतर कदम यांच्या डोक्यावरील हात काढून घेतला. त्यामुळे कदम यांच्याविरोधात तक्रारींचे प्रमाण वाढले होते.
आता खेडच्या अ‍ॅड. विजय भोसले यांची काँगे्रसच्या जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत एकही पदाधिकारी नसलेल्या काँग्रेसला आता त्यांच्याकडून नवसंजीवनीची अपेक्षा आहे.

सर्वच तालुक्यांना आली आहे मरगळ

सद्यस्थितीत राजापूर वगळता अन्य कोणत्याही तालुक्यात काँग्रेस एकसंध नाही. राजापुरातही गटाचे राजकारण तीव्र आहे. त्यामुळे गटबाजीने त्रस्त झालेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे आणि एकत्र ठेवण्याचे मोठे आव्हान अ‍ॅड. भोसले यांना पेलावे लागणार आहे.

Web Title: Navsanjivani to the Ratnagiri Congress, devoted to gangs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.