नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 10:48 AM2024-05-05T10:48:57+5:302024-05-05T10:49:38+5:30

Surat Crime Branch nabs Maulvi : सोहेल अबुबकर मौलवी हा भाजपाच्या माजी नेत्या नुपूर शर्मा, भाजपा आमदार टी. राजा सिंह, हिंदुत्ववादी नेते उपदेश राणा यांच्या हत्येचा कट रचत होता. 

Surat Crime Branch nabs Maulvi for threatening Hindu leader | नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 

नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 

सूरत : एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी धामधूम सुरु आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीदरम्यान सूरत गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. देशातील हिंदू नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या मोहम्मद सोहेल उर्फ ​​मौलवी अबुबकर टीमोल (वय २७) याला सुरत गुन्हे शाखेने कठौर परिसरातून अटक केली आहे. सोहेल अबुबकर मौलवी हा भाजपाच्या माजी नेत्या नुपूर शर्मा, भाजपा आमदार टी. राजा सिंह, हिंदुत्ववादी नेते उपदेश राणा यांच्या हत्येचा कट रचत होता. 

मौलवीच्या मोबाईल चॅटमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपी मौलवीचा पाकिस्तान, नेपाळसह अनेक देशांमध्ये राहणाऱ्या कट्टरपंथीयांशी संपर्क होता. हिंदू सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा यांच्या हत्येसाठी एक कोटी रुपयांची सुपारी आणि पाकिस्तानातून शस्त्रे मागवत असल्याचे मौलवीच्या मोबाइल चॅटवरून समोर आले आहे. कमलेश तिवारीप्रमाणे उपदेश राणा यांना पाकिस्तान आणि नेपाळसह इतर देशांतील कट्टरतावादी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

शारिरीकदृष्ट्या मजबूत आणि कट्टरपंथी मौलवी अबूबकर टीमोल हा फक्त २७ वर्षांचा आहे, परंतु गेल्या काही काळापासून त्यांच्या कट्टरपंथी विचारसरणीमुळे तो सुरतमध्ये राहणारे सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा यांना मारण्यासाठी पाकिस्तानमधून शस्त्रे मागत होता. तसेच, हे काम पूर्ण करण्यासाठी तो एक कोटी रुपयेही देत ​​होता. याशिवाय, मौलवी अबूबकर टीमोल याने निलंबित भाजपा नेत्या नुपूर शर्मा, भाजपा आमदार टी. राजा सिंह आणि इतरांना ठार मारण्याचा आणि धमकावण्याचा कटही रचला होता.

सूरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी सांगितले की, यासंदर्भात सूरत शहर गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती. त्यानुसार त्या व्यक्तीची कृती देशविरोधी आहे आणि त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्याला सूरतच्या चौक बाजार परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तो पाकिस्तान आणि नेपाळमधील लोकांशी बोलत होता. हिंदू सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा यांना प्रथम लक्ष्य करण्याचा त्याचा डाव होता.

आरोपी सूत बनवणाऱ्या कंपनीत काम करत होता
सूरत गुन्हे शाखेने पकडलेला  मौलवी अबूबकर टीमोल हा सुरत ग्रामीणच्या कामरेज तहसील अंतर्गत कठौर गावचा रहिवासी आहे. आरोपी सूत बनवणाऱ्या कंपनीत काम करत होता. तसेच, तो आपल्या घरी मुस्लिम मुलांना धार्मिक ज्ञानही देतो, म्हणून त्याला मौलवी असेही संबोधले जाते. सूरत गुन्हे शाखेला काही दिवसांपूर्वी त्याच्या कट्टरवादी मानसिकतेची जाणीव झाली होती. 

Web Title: Surat Crime Branch nabs Maulvi for threatening Hindu leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.