राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
फक्त क्रिकेटमध्येच नाही तर व्यकीगत आयुष्यात किंवा समाजात वावरताना सुद्धा एका साध्या- सरळ गृहस्थाप्रमाणे राहतो. याचे साधे उदाहरण द्यायचे म्हटले, तर सध्या राहुल द्रविडचा रांगेत उभा असलेला एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ...
बीसीसीआयवर आरोप लावल्यानंतर श्रीसंत पुन्हा एकदा मीडियामध्ये चर्चेत आहे. आता त्याने माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनीवर आरोप लावले आहेत. ...
'रोटेशन गरजेचं आहे. खूप सामने खेळले जात आहेत, त्यामुळे खेळाडूंना रोटेट करणं गरजेचं आहे. खेळाडूंना रोटेट करण्यासंबंधी व्यवस्थापन योग्य निर्णय घेत आहे', असं राहुल द्रविड बोलला आहे. ...
अल्पावधीतच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या हार्दिक पांड्याचे चौहुबाजूंनी कौतुक होत आहे. हार्दिक पांड्याचा खेळ माझ्यापेक्षा सरस आसल्याचे सांगत माजी कर्णधार कपिल देव यांनी त्याच्यावर कौतुकाची थाप टाकली आहे. ...
भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराटसेनेवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. दुसऱ्या कसोटीच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते ...