जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
उरी येथे लष्कराच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’चा भरपूर उदो उदो केलेल्या नरेंद्र मोदी सरकारलाही, यावेळी ‘सर्जिकल स्ट्राइक’पेक्षा आणखी कठोर कारवाई करावी लागेल, ही जाणीव झाली आहे. ...
सिन्नर : काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथील शिवाजी चौकात भाजपाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. ...