भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
सावंत यांची सोमवारी भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड जाहीर झाली. त्यानंतर भाजपने राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रणही दिले. ...
विधिमंडळ नेता निवडण्यासाठी आमदारांची दुपारी ४ वाजता एकत्र बैठक घेतली जाणार होती. परंतु निरीक्षकांनी दुपारी ४.३0 वाजता भाजपच्या येथील प्रदेश कार्यालयात एकेका आमदाराला बोलावून घेऊन त्यांचे म्हणणे ऐकले. ...