IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे

Vaibhav Suryavanshi Bat Pakistan Cricket: IPL 2026: वैभव सूर्यवंशीबद्दल केलेल्या आरोपावरून चाहते प्रचंड मजेशीर कमेंट करत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 15:53 IST2026-04-28T15:49:58+5:302026-04-28T15:53:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Strange allegations as pakistan expert says vaibhav suryavanshi bat has ai chip also doubts age | IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे

IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे

Vaibhav Suryavanshi Bat Pakistan Cricket: IPL 2026 मध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने खळबळ माजवणारा १५ वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या तुफान फॉर्मात आहे. केवळ आंतरराष्ट्रीय गोलंदाजच नव्हे तर आघाडीचे वेगवान गोलंदाजही वैभवसमोर गोलंदाजी करताना विचारात पडतात. सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करण्याची वैभवची शैली त्याला खूपच फायदा मिळवून देते. त्यामुळे तो खोऱ्याने धावा जमवताना दिसतो. भारतासह जगभरात वैभव सूर्यवंशीच्या खेळीची स्तुती होत असतानाच एका पाकिस्तानी क्रिकेट एक्सपर्टने मात्र आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्याने वैभव सूर्यवंशीवर एक अजब आरोप केला आहे.

काय आहे आरोप?

पाकिस्तानचे क्रिकेट विश्लेषक नौमान नियाज यांनी वैभवच्या फलंदाजीवर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी म्हटले की, "हा मुलगा नेमका काय आहे? त्याची बॅट तपासायला हवी. ज्याप्रमाणे वाडा (WADA) डोपिंगची चाचणी करते, तशीच याच्या बॅटची लॅबमध्ये चाचणी करा. कदाचित त्याने त्याच्या बॅटमध्ये AI चिप (AI Chip) बसवली असावी." याचाच अर्थ त्यांना असे सुचवायचे आहे की, त्याच्या बॅटमध्ये लावलेल्या चिपमुळे त्याची फलंदाजी अधिक सोपी बनते.

वयावरूनही केले आरोप

वैभवने अलीकडेच हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ३७ चेंडूत १०३ धावा कुटल्या. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक. १५ व्या वर्षी अशी ताकद आणि टायमिंग पाहून पाकिस्तानी तज्ज्ञांना आश्चर्य वाटले असून, त्यांनी त्याच्या शरीराच्या वाढीवर आणि वयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

भारतीय चाहत्यांनी या आरोपांना हास्यास्पद ठरवले असून, वैभवच्या प्रतिभेचा हा अपमान असल्याचे म्हटले आहे. अनेक युजर्सनी "पाकिस्तानी तज्ज्ञांना वैभवचे यश पचत नाहीये," अशा शब्दात टीका केली आहे. वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने केवळ धावांचा पाऊस पाडला नाही, तर जगभरातील दिग्गजांना विचार करायला भाग पाडले आहे. त्याच्या 'हार्ट आणि सॅल्यूट' सेलिब्रेशनप्रमाणेच आता हा 'AI चिप'चा वादही सोशल मीडियावर जोरात चर्चेत आहे.

वैभवची कामगिरी

वैभव सूर्यवंशी सध्या आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानसाठी खेळताना त्याने ८ सामन्यांत ४४.६२ च्या सरासरीने आणि २३४.८७ च्या तुफानी स्ट्राईक रेटने ३५७ धावा केल्या आहेत.

Web Title : आईपीएल 2026: वैभव सूर्यवंशी के बल्ले में एआई चिप, पाकिस्तानी विशेषज्ञ का आरोप

Web Summary : पाकिस्तानी क्रिकेट विशेषज्ञ ने वैभव सूर्यवंशी के बल्ले पर सवाल उठाए, आईपीएल में उनके विस्फोटक प्रदर्शन के बाद एआई चिप के इस्तेमाल का सुझाव दिया। आरोपों में उम्र संबंधी चिंताएं और अनुचित लाभ शामिल हैं, जिससे भारतीय प्रशंसकों में आक्रोश है।

Web Title : IPL 2026: Pakistani expert alleges AI chip in Vaibhav Suryavanshi's bat.

Web Summary : Pakistani cricket expert questions Vaibhav Suryavanshi's bat, suggesting AI chip use after his explosive IPL performance. Accusations include age concerns and unfair advantage, sparking outrage among Indian fans who dismiss the claims as sour grapes.