सरकारने नाफेडमार्फत २,४१० रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या खरेदीच्या अटी शर्तीबाबत शेतकऱ्यांत रोष असताना आता नाफेडने कांद्याचे दर तब्बल १३६ रुपयांनी घटविल्याने बळीराजाच्या असंतोषात आणखीनच भर पडली आहे. ...
चाकण बाजारामध्ये बुधवारी (ता. ३०) दोन हजार कांदा पिशव्यांची म्हणजे १ हजार क्विंटलची आवक झाली. प्रतवारीनुसार त्यास प्रतिक्विंटलला पंधराशे ते आठराशे रुपये भाव मिळाला. यामुळे उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे. ...
गेल्या जानेवारीत राज्यातील कांद्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावाने कांदा विकावा लागला. कांद्याला दर नसतानाही शेतकऱ्यांनी बाजार समिती आणि खासगी बाजार समितीत अत्यल्प दराने कांदा विकला होता. ...
कांदा अनुदानासाठी आलेल्या प्रस्तावाची लेखापरीक्षकांकडून शासकीय तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार १५२ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असून या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...