एटापल्ली तालुक्यातील कोटमी गावाजवळील अलेंगा जंगल परिसरात पोलीस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये एक महिला नक्षलवादी ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. ...
नक्षल चळवळीतून पाच वर्षांपूर्वी बाहेर येऊन पोलिसांकडे आत्मसमर्पण केलेल्या युवकाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना धानोरा तालुक्यातील दराची या गावाजवळील जंगलात घडली. ...
दंडकारण्यात दहशत माजवणाऱ्या नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माणसं आता नाकारू लागली आहेत. बंदुकीच्या धाकावर थरार माजवू पाहणा-यांना आता थारा द्यायचा नाही, कुठलेही सहकार्य करायचे नाही, असा ठराव घेत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल स्मारक उद्ध्वस् ...
भामरागड तालुक्यातील नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा व पेनगुंडा येथील नागरिकांनी एकत्र येत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल्यांची चार स्मारके उद्ध्वस्त करून आपल्याला शांती व विकास आवश्यक असल्याचे आवाहन नक्षल्यांना केले. ...
तालुक्यातील विसामुंडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी तीन भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी नागरिकांना त्यांच्याकडे असलेली शस्त्रे पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले होते. ...