विदेशी पर्यटकांनी भारतातील व्याघ्र अभयारण्यांना भेट देऊ नये, असे धक्कादायक आवाहन करणाऱ्या सर्व्हायव्हल इंटरनॅशनल या लंडनमधील संघटनेचा व संघटनेचे संचालक स्टीफन कॉरी यांचा पेंचमधील गाईडस् व एनएनटीआर यांनी गुरुवारी निषेध केला. ...
वन व्यवस्थापन समितीचे सदस्य व वन सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना सवलतीच्या दरात एलपीजी जोडणी देण्यासाठी हिंगणा येथील एजन्सी निवडण्यावर विविध गावांतील नागरिकांनी आक्षेप घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
भारतीय घटनेतील ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांची भागीदारी वाढली आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून संधी निर्माण होत असतानाच समाजाने त्यांना प्रोत्साहन दिले तर महिला अधिक समक्षपणे काम करू शकतात, असा ...
नागरिकांना त्यांच्या दारात न्याय देणे शासनाची जबाबदारी आहे, असे मौखिक मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावर आदेश देताना नोंदविले. ...
वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील आरोपी व ताजश्री समूहाचे संचालक अविनाश रमेश भुते यांनी गुरुवारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी त्यांची कारागृहात रवानगी केली. ...
केंद्र शासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन प्रमाणपत्रासंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या दूर केल्या आहेत. त्यामुळे देशातील असंख्य केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...