जिल्ह्यात कोरोना संक्रमणासह रुग्णांचा मृत्यूदरही सतत वाढत आहे. बुधवारी सर्वाधिक ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या महिन्यात आधी पाचवेळा ५० व त्यावर मृत्यू झाले आहेत. २५ ऑगस्ट रोजी ५२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ...
शासनाने एखाद्या विषयाच्या सखोल अभ्यासासाठी निर्माण केलेले अभ्यासगट किती निष्काळजीपणे वागतात याची प्रचिती शिक्षकांना आली आहे. शासनाने खासगी आस्थापनातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना ...
नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये कोरोना संक्रमण काळात ऑक्सिजनचा तुटवडा पडू नये यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात ...
अनलॉक-४ मध्ये ऑड-इव्हन सुरू झाल्यानंतर दुकाने खुली झाली आहेत. पण दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होण्याऐवजी फूटपाथवरील दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची जास्त गर्दी दिसून येत आहेत. याशिवाय मॉलमध्ये ग्राहकांचा अभाव आहे. ...
शहरात मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाधित रुग्णांचा दुप्पट होण्याचा रेट १५ दिवसावर आला होता. आता तो वाढून २१ दिवस झाला आहे. आरोग्य विभागाद्वारे ही माहिती दिली. ...
देशातून निर्यात वाढल्यानंतर अत्यावश्यक वस्तूच्या कायद्यातून वगळण्यात आलेल्या कांद्यावर केंद्र शासनाने निर्यातबंदी घातली आहे. त्यानंतर बाजारात कृत्रिमरीत्या वाढलेले कांद्याचे भाव अचानक खाली आले आहेत. कळमना ठोक बाजारात प्रति किलो भाव ६ ते ८ रुपयांनी कम ...
कोरोना महामारीमुळे देशातील लहान व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत. भविष्यात या व्यावसायिकांना केंद्र व राज्य शासन आणि बँकांनी मदत न केल्यास देशातील २५ टक्के अर्थात जवळपास १.७५ कोटी व्यावसायिकांची दुकाने बंद होतील. त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत पर ...